निमगाव म्हाळुंगीत बारा वर्षांनी आली एस.टी

निमगाव म्हाळुंगी,ता.४ जानेवारी २०१७ (जालिंदर अादक) : येथे गेले बारा वर्षाच्या कालखंडानंतर गावामध्ये प्रथमच एस टी अाल्याने ग्रामस्थांनी पेढे वाटुन अानंद साजरा केला.

या गावात एस टी चालू करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे व गावातील कार्यकर्त्यांनी वेळोवळी पाठपुरावा करून राज्य परिवहनच्या आगार व्यवस्थापक यांच्या आदेशाने हि एस टी गावात चालू करण्यात आली. यामुळे गावातील बाहेरगावी उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची सोय झाल्याने व गावातीलप्रवाशांची झालेल्या सोयीबद्दल गावकर्यांनी आनंद व्यक्त केला अाहे.

राज्य परिवहन मंडळाची गाडी शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे यामार्गे निमगाव म्हाळुंगी येथे मुक्कामी सायंकाळी ७.३० वाजता गावात येणार असुन  दुसऱ्या
दिवशी सकाळी ५.४५ वाजता निमगाव-तळेगाव ढमढेरे-शिक्रापूर या मार्गे तर पुन्हा शिक्रापूर-तळेगाव-निमगाव अशी सुटणार असुन  निमगावातून सकाळी १०.१५ वाजता निमगाव-तळेगाव-शिक्रापूर अश्या फेऱ्या मारल्या जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी दिली. सन २०१२ साली एस टी चालू करण्यासाठी पाठपुरावा करत आज गावामध्ये एस टी चालू झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नसून शाळेत जाणारे विध्यार्थी किंवा जेष्ठ नागरिक, महिला यांची सोय झाल्याने गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

शिरूर आगार व्यवस्थापक यांच्याकडे शिरूर-खंडाळमाथा-निमगाव अशी एसटी चालू करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव करून अर्ज करण्यात आला होता परंतु
चर्चेनंतर १ तारखेला गावात एस टी सुरु करण्यात आली.

गावात प्रथमच  एसटी अाल्याने चालक आणि वाहक यांचा फेटा शाल श्रीफळ देऊन गावच्या सरपंच ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी गावचे महिला सरपंच छाया चव्हाण,ग्रा.पं.सदस्य सुप्रिया नेटके,रावसाहेब चव्हाण,माणिक रणसिंग,भाऊसो चौधरी,जालिंदर कुटे,विजय आढाव,बाबनभाई बागवान शरद कुसाळकर,मेजर काळे,रविंद्र नेटके,माऊली पवार,बाळासाहेब चव्हाण,शेखर कंक,भूषण कारकुड,सोपान चव्हाण,कैलास चव्हाण,निळोबा विधाटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या