नमीरा मुल्ला व कार्तिक सासवडे ‘सर्वोत्कॄष्ट कराटे खेळाडू’

शिक्रापुर,ता.४ जानेवारी २०१७ (प्रा.एन.बी.मुल्ला) :  नमीरा मुल्ला व कार्तिक सासवडे यांना वर्ष 2016 मधील ‘सर्वोत्कॄष्ठ कराटे खेळाडू’ पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले अाहे.

शिक्रापूर येथे शोतोकॉन ग्लोबल जपान कराटे असोसिएशनच्या वतीने सर्वोत्कॄष्ठ कराटे खेळाडू पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शोतोकॉन असोसिएशनच्या इंद्रप्रस्थ कराटे अकादमीच्या नमीरा नुरमहमद मुल्ला हिला मुलींमध्ये तर कार्तिक बाबासाहेब सासवडे याला मुलांमध्ये सन 2016चा सर्वोत्कॄष्ठ कराटे खेळाडू पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी माजी जि.प.सदस्या रोहीणी सासवडे, पोलीस मित्र संघाच्या अध्यक्षा मंगल भुजबळ, युवा उद्योजक मंगेश सासवडे, शामराव बेंडभर, शिक्षक परीषदेचे तालुका कार्याध्यक्ष प्रा.एन.बी.मुल्ला, शेरखान शेख, सारीका सासवडे, प्रा.गावडे, सोमनाथ अभंग, किशोर मराठे, प्रदीप ढगे, विजय आघाव, प्रसाद गदादे, जाकीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात इंद्रप्रस्थ कराटेच्या खेळाडूंनी कराटे मधील विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.मुलींनी आपत्कालीन परीस्थितीत स्वसंरक्षण करून प्रतिकार कसा करायचा याचेही प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरण केले.याप्रसंगी आयोजित सांस्कॄतिक कार्यक्रमात खेळाडूंनी हिंदी व मराठी गाण्यावर नॄत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.तर कांही खेळाडूंनी माझी आर्इ व छ.शिवाजी महाराज या विषयावर मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात स्नेहल वाळुंज या खेळाडूचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सोमनाथ अभंग यांनी केले तर विजय आघाव यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या