शिरुर तालुक्यात फ्लेक्सचं फुटलंय पेव !

रांजणगाव गणपती, ता.६ जानेवारी २०१६(सतीश केदारी) : शिरुर तालुक्यात निवडणुकिच्या तोंडावर फ्लेक्सचं भलतचं पेव फुटलं असुन पुणे नगर महामार्ग हक्काचे ठिकाणच बनत असुन हे फ्लेक्स गावोगावी देखिल दिसु लागले अाहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अगदी तोंडावर येउन ठेपल्या असुन त्या अनुषंगाने इच्छुकांची देखिल भाउगर्दी होउ लागली अाहे.मतदारांना अाकर्षित करण्यासाठी इच्छुकांकडुन नामी शक्कल लढवली जात असुन 'काहि इच्छुकांचे' फ्लेक्स हे चर्चेचे विषय ठरत असुन  नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी काहिंनी तर गावोगावी फ्लेक्स लावलेले अाहेत.तर एका इच्छुकाचा देखिल नुकत्याच साज-या झालेल्या  वाढदिवसाची त्या गटात चांगलीच चर्चा होती.

हे चिञातलं कोण ?
शिरुर तालुक्यात गावोगावी लागलेले फ्लेक्स पाहुन सर्वसामान्यांना  अाजवर कधीही न दिसलेले प्रत्यक्षात शुभेच्छा देणारे बॅनर दिसु लागल्याने नागरिकांची चांगलीच करमणुक होत अाहे.

दुसरीकडे पुणे-नगर महामार्ग हा हक्काचे ठिकाण बनत चालले असुन 'बॅनर लागला तर भिंती एवढा तरी लागेल' याची पुरेपुर काळजी घेतली जात अाहे.हा चेहरा  हा अनेकांपर्यंत  कसा पोहोचवता  येइल या साठी इच्छुकांचा चाललेला अाटापिटा व त्या साठी मोठा होणारा खटाटोप हाच सर्वसामान्यांचा चर्चेचा विषय ठरत असुन निवडनुक जशी जवळ येइल तसे मतदारांचा अनेकांना पुळका येणार असल्याची चर्चा नागरिकांत होउ लागली अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या