ती सध्या काय करते? ने तरुणाई सैराट

शिरुर, ता.९ जानेवारी २०१७ (सतीश केदारी) :म्हातारपण असो कि तरुणपण परंतु प्रत्येकाच्या अायुष्यात  एकदा पडलेल्या  या प्रश्नाने सध्या सोशल मिडियावर प्रचंड धुमाकुळ घातला असुन  तरुणाई सैराट झाली असल्याचे दिसते.

सतीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय काय करते ? हा सिनेमा नुकताच रिलिज झाला असुन या सिनेमाच्या नावानेच सध्या सोशल प्रचंड मेसेज व्हायरल होत असुन अनेक मजेशीर जोक तर काहि भावनिक मेसेज शेअर होत अाहेत.प्रत्येकाच्या अायुष्यात एकदा तरी पडलेल्या प्रश्नाने शाळा कॉलेज कट्टयावर देखिल प्रचंड चर्चा होत असुन फेसबुक वॉल वर अनेक # टॅग वापरुन कोणी जुन्या अाठवणी  शेअर करताना दिसतो तर कोणी सध्या च्या वास्तवाशी संबंध जोडत अाहेत.यातही अनेक जण संवेदनशील महिला अत्याचारा विषयीची उद्ग्विनता  शेअर करु पाहत अाहेत .व्हॉट्सअप च्या अनेक ग्रुप वर देखिल या संबंधी अनेक पोस्ट फॉरवर्ड होताना दिसत असुन तरुणांप्रमाने महिला वर्गात देखिल क्रेझ असल्याचे दिसते.
एकंदरीत गुलाबी थंडीत देखिल ती सध्या काय करते ? या प्रश्नाने तरुणाई भलतीच सैराट झालेली दिसते.

 #तीसध्या_काय_करते असा हॅशटॅग वापरत फॉरवर्ड होत असलेले मेसेज पाहुयात कोणते अाहेत ते :

'ती सध्या काय करते'
...याचा विचार करण्याअगोदर
हे विसरु नका,
तुमची हि सुद्धा
शाळेत जात होती..!

ती सध्या काय करते ?
ते पहायला 'ती' चा तो समर्थ अाहे..!

तुम्ही फक्त दिवस राञ
तुमच्या सुखासाठी झटणा-या
तुमच्या 'हि' चा विचार करा.. हे जास्त महत्वाचे अाहे.

हल्ली ती काय करतेय…

ती सुनीता विल्यम्स झालीय…
ती कल्पना चावला झालीय…
ती सायना, सानीया झालीय…

तरीही आपण तीच्यात सनीच शोधत विचारतो…

हल्ली ती काय करते…
हल्ली ती फक्त गर्भातच नाही मारली जात
तर ती रोज मारली जातीये परंपरेने…

तीच्यावर कुठला एक नराधम नाही करत बलात्कार…
तर त्या नराधमाने केलेल्या बलत्काराची पायरी करुन चढतात तीच्यावर हजारो राजकीय ईमले…

ती सध्या काय करते…?
ती गर्भात असतानाच तपासली जाते..
एखादीच ती अनेक यातनातुन जन्म घेते…

ती हसते, बागडते आईच्या कुशीत…
पण ते तीचे हसणे बागडणे कुशीतच संपते…
आणि वयाबरोबर बनत जाते ती आस्मीता, खानदान की ईज्जत वगैरे…

मग ती जीवंतपणी बनते गुलाम पुरुष नावाच्या प्राण्याची…
तो कधी बाप असतो, कधी भाऊ असतो, कधी प्रीयकर असतो तर कधी नवरा…
हे सर्व तीला वापरतात आपले पुरुषी नाते अबाधित करण्यासाठी…


ती सध्या काय करतेय?
रंग,रुप अन देहापलिकडे तो सन्मानाने कधी पाहणार?
याची वाट पाहतेय..

भररस्त्यात होणारे बलात्कार,छेडछाड कधी थांबणार?
याची वाट पाहतेय?
अॅसिड फेकुन सुड न घेता,तिचा नकार पचवायला कधी शिकणार?
याची वाट पाहतेय..

मर्दानगीच्या खोट्या कल्पनांतुन बाहेर पडुन 'तो'माणुस कधी होणार?
याची वाट पाहतेय?
ती 'त्याची', एका निस्वार्थी माणसाची
वाट पाहतेय...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या