सैनिकाच्या घराची अामदारांकडुन पाहणी; तोडगा नाहीच

मांडवगण फराटा, ता.९ जानेवारी २०१७ (संपत कारकुड): येथील सैनिक बाळु चौघुले यांची ग्रामपंचायतीने कारवाईमध्ये पाडलेल्या घराची व जागेची पाहणी तालुक्याचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी केली. परंतु जागा व घर देणेबाबत अद्यापही ठोस असा कोणताही निर्णय होवू शकला नसल्यामुळे त्यांच्या सर्व कुटुंबाला ऐन थंडीमध्ये तात्पुरत्या केलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गुजारणा करावी लागत आहे.

लान्सनायक  बाळु चौघुले यांचे कारवाईमध्ये पाडलेल्या घराची माहिती मिळाल्यानंतर तालुक्याचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी स्वतः ग्रामपंचायत येथे भेट देवून माहिती घेतली. त्यांच्याबरोबर तहसिलदार राजेंद्र पोळ, शिरुरचे गटविकास अधिकारी संदीप जठार तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांसह असंख्य ग्रामस्थ होते. यावेळी ग्रामपंचायतीकडुन सांगितले की, तुला 1 गुंठा काय दिड गुंठा जागा देतो, परंतु दुस-या ठिकाणी देतो, यावर चौघुले यांनी मला पाडलेल्या ठिकाणीच जागा द्या, ही जागा कोणालाही अडचणीची नसून एका कोप-यामध्ये आहे. तसेच किमान या ठिकाणी केलेल्या पायाचा खर्च तरी वाचेल, अशी विनंती केली. जागा देण्यात व घेण्यात कोणतेही एकमत झाले नसल्यामुळे सैनिक चौगुले यांचा जागेचा व घराचा प्रश्न आजही अनुत्तीर्णच  राहिला आहे.

दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा घेवून जागा व घर देण्याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये तहसिलदार गटविकास अधिकारी, सरपंचासह सर्व ग्रामपंचायत बॉडी जातीने हजर होती. यामध्ये सैनिकाला घरासाठी 1 गुंठा जागा देवून त्याला जाण्या-येण्याचा रस्ता तयार करण्यावरही चर्चा झाली. परंतु जागा देण्याबाबत जी प्रकीय प्रक्रिया पुर्ण करावी लागते, ती किती वेगाने होते आणि त्यानंतर जागा आणि घर तयार होते हे केवळ वेळच सांगू शकेल.

ग्रामपंचायत गावठाण हददीमध्ये गेली अनेक वर्षांपासुन मोठे अतिक्रमण झालेले आहे. यामध्ये राहण्याची घरे, दुकाने पत्र्यांच्या शेड, रस्त्याच्या कडेला व्यावसाईक टप-या इत्यादींचा समावेश आहे. परंतु अगदी अलिकडे बांधलेली नवीन घरे, तंबुच्या राहुटया इत्यादीमध्ये राहणा-या गरीब नागरिकांना बेघर करुन ग्रामपंचायतीने नेमके कोणाचे हित साधले, असा प्रश्न येथील ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या