शिरुरच्या अाजी-माजी अामदारांची स्टंटबाजी ?

शिरुर, ता. ११ जानेवारी २०१७ (सतीश केदारी) : शिरुरच्या अाजी-माजी अामदारांची प्रसारमाध्यमातून एकमेकांवर अारोप-प्रत्यारोप झाल्याने शिरुरच्या  नेत्यांची हि निवडणुकिच्या तोंडावर स्टंटबाजी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होT लागली अाहे.

चासकमान कालव्याच्या पाण्यावरुन विद्यमान अामदार व माजी अामदारांमध्ये होणारे द्वंद्व युद्ध फक्त स्थानिक वर्तमानपञांमधून नागरिकांना पहायला मिळत असुन यामध्ये एकमेकांना अाव्हान-प्रतिअाव्हान केले अाहे. अावर्तनाबाबत तक्रार असेल तर समोरासमोर बोलावे असे अाव्हान पाचर्णे यांनी पवार यांना दिले होते तर पवार यांनी देखिल चर्चेची तयारी असेल तर अामदारांनी सोयीची वेळ सांगावी असे सांगत थेट निशाना साधला होता.

या संबंधीचे सविस्तर वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये पसरल्याने अाजी अामदारांना चासकमान पाण्याचा भलताच कळवळा येत असल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासुन गाव पारावर रंगत आहेत.  ऐन उन्हाळ्यात चासकमानच्या पुर्वभागातील  लाभक्षेञात पाण्याअभावी पिके जळाली तेव्हा का  इतकी तत्परता  दाखवली गेली नाही? असा  सवाल सर्वसामान्यांच्या चर्चेत ऐकायला मिळत अाहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका  तोंडावर अाल्यानेच नेत्यांना शेतक-यांचा पुळका येउ लागला आहे. मतदारांना भुलविण्यासाठी व चर्चेत राहण्यासाठी आजी-माजी आमदारांची स्टंटबाजी तर नाही ना? केवळ चर्चेत राहण्यासाठी व प्रसिद्धी मिळविण्यासाठीच हे दिसत आहे, अशा चर्चा सोशल नेटवर्किंगसह नागरिकांमध्ये होऊ लागल्या अाहेत.
(संंबंधित वृत्तपञ काञण  दै.सकाळ कडुन साभार)

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या