शिरुर-कुर्ला एस.टी बस पुन्हा सुरु करावी

कान्हुर मेसाई,ता.१२ जानेवारी २०१७(प्रतिनीधी) : प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेत शिरुर-कुर्ला एस.टी पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष भास्कर पुंडे यांनी केली अाहे.

शिरुर-कुर्ला  हि बस काहि दिवसांपुर्वी कोणतीही सुचना न देता शिरुर अागाराकडुन बंद करण्यात अाली अाहे.त्या मुळे परिसरातील विद्यार्थी, नोकरदार,शेतकरी व महिला वर्गाचे प्रचंड हाल होत अाहेत.त्याचप्रमाणे शिरुर-राजगुरुनगर या बस च्या देखील फे-या वाढवण्यात येउन सायंकाळी पाचच्या दरम्यान एक बस फेरी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.या मार्गावर प्रवाशी संख्या देखिल भरपुर असुन अागारप्रमुखांनी तत्काळ लक्ष देण्याची मागणी या वेळी करण्यात अाली.या मागण्यांचे निवेदन शिरुर चे अागार प्रमुख यांना नुकतेच देण्यात अाले अाहे.

या वेळी युवक अाघाडी चे रणजित फंड, विद्यार्थी अाघाडी चे अनिकेत कर्डिले,गणेश सटाले, विद्यार्थी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या