जवान चौघुलेंना ग्रामपंचातीकडून जागा देण्याचा निर्णय

मांडवगण फराटा, ता. 23 जानेवारी 2017 (संपत कारकुड)- मांडवगण फराटा ग्रामपंचायतीने केलेल्या कारवाईत जवान बाळु चौघुले यांचे घर पाडल्यानंतर तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला. यानंतर जाग आलेल्या ग्रामपंचायतीने चौघुले यांना घरासाठी एक गुंठा जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

चौघुले यांचे ग्रामपंचायचीने घर पाडल्यानंतर सर्वप्रथम www.shirurtaluka.comने वृत्त प्रसारीत करून सर्वांचे लक्ष वेधले होते. शिवाय, या प्रकरणाचा पाठपुरावाही केला होता. चौघुले यांच्या घरासाठी पाडलेल्या ठिकाणीच 1 गुंठा जागा देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असून, जागा मोजमाप करुन देण्यात आली आहे. मात्र, शासनाकडून यासाठी कोणताही लेखी आदेश झालेला नाही. त्यामुळे जागा देण्याचा निर्णय सध्या तरी अधांतरीच आहे. जागेचा प्रश्न सध्या जरी मिटला असून, त्या जागेवर घर बांधण्यासाठी लागणाऱया खर्चाचा नाहक भुर्दंड या जवानाच्या कुटुंबाला पडणार आहे.

चौघुले यांचे घर पाडल्यानंतर एैन थंडीच्या दिवसांमध्ये त्यांच्या भावासह वृध्द आई-वडिलांना एका गोठा वजा पत्र्याच्या शेडचा आधार घ्यावा लागला होता. शासनदरबारी आपली व्यथा मांडताना अनेक समस्यांना तोंड देवून 'मला घर देता का, घर' अशी भिक मागण्याची वेळ या जवानावर आली होती. जवानाची व्यथा जिल्हाधिकाऱयासह, तहसिलदार, गटविकास अधिकारी, आमदार, खासदार यांच्यापर्यंत सर्वदुर पोचली खरी परंतु जागा देण्यासाठी मात्र प्रशासनान व राजकिय पुढाऱयांनी फक्त सहानुभूती व्यक्त करुन वेळकाढुपणाचेच धोरण स्विकारले होते. आपली चिकाटी न सोडता सततच्या पाठपुराव्याने उशीरा का होईना ग्रामपंचायत स्तरावरच या जवानाला 1 गुंठा जागा देण्याचा निर्णय झाला.

सर्वच बाजुने दबाव आल्यानंतर चुकीच्या कारवाईने आपल्याला खुप मोठया समस्याला समोरे जावे लागेल, याची जाणीव झाल्यावर उशिरा ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला. आता या निर्णयप्रमाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांनी तातडीने जागेचा अहवाल पाहुन जागा देण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता असून, जागा कागदोपत्री मिळाल्यानंतरच त्यावर बांधकाम होवू शकते. परंतु आता या कामात वेळ जात असल्यामुळे नेमके प्रथम काय करावे? या विवंचनेत सध्या जवानाचे कुटुंब आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या