...अखेर सैनिकाला मिळाला न्याय

मांडवगण फराटा, ता.२४ जानेवारी २०१७ (संपत कारकूड): अतिक्रमणाच्या कारवाईमध्ये पाडलेल्या सैनिक बाळु चौगुलेच्या घराचे भुमिपुजन नुकतेच करण्यात अाले असुन अखेर न्याय मिळाला असुन सैनिकाला ह्क्काचा निवारा मिळणार अाहे.संकेतस्थळाने या वस्तुस्थितीबाबत सडेतोड भुमिका घेत वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते.

सविस्तर माहिती अशी कि, ग्रामपंचायत मांडवगण फराटा ने गावातील निवडक गोर-गरिबांच्या घरावर अतिक्रमणाच्या नावाखाली केलेल्या कारवाईमध्ये सैनिक बाळु चौघुले यांच्या घराचाही समावेष होता. घर पाडल्यानंतर चौघुले यांना डोक्यावर छप्परच नसल्याने  ऐनथंडीच्या काळात ही गोठावजा पत्र्याच्या शेडमध्ये राहावे लागले होते.

एकीकडे सैनिक शहीद झाल्यावर पुष्पचक्र वाहुन आदरांजली वाहताना राजकीय नेत्यांच्या रांगा लागतात परंतु जिवंतपणी घरपाडल्याच्या यातना सहनकरणा-या सैनिकाचे घर जमीनदोस्त झाल्यानंतर मात्र पुढा-यांनी याकडे पुर्णतः पाठफिरविली होती.‘देतो-घेतो’च्याअाश्वासनाने सामान्यांचे पोट भरत नसते. त्यासाठी प्रत्यक्ष कृतीचीही गरज असते,हे बाळु चौघुले यांचे घर पाडताना व जागा मिळविताना पावलोपावली अनुभवास आले.

सैनिकाचे घर पाडल्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे मिलिंद एकबोटे, बापू काळे, धामारी गावचे सैनिक सेवेमध्ये असणारे मेजर तुकाराम ढफळ, मानव अधिकारचे सुनिल धागटोडे, गावातील सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती थोरात, रंजित पाडळे, डॉ. रमेश राठोड, बालाजी कांबळे, अतुलवाळके यांचीमोलाचीमदतझाली.

संकेतस्थळाचे मानले अाभार
शिरुर तालुक्याचे मुखपञ असणारे संकेतस्थळ www.shirurtaluka.com अतिक्रमणाच्या दोन्ही बाजुंचा विचार करत सडेतोड भुमिका घेत वारंवार सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले होते.मुख्यमंञी कार्यालयाकडे या बाबत वारंवार पाठपुरावा केला होता.सैनिक बाळु चौघुले व कुटुंबियांनी तसेच मिलिंद एकबोटे यांनी संकेतस्थळाचे कौतुक करत अाभार व्यक्त केले अाहेत.

असा होवू शकतो जागेचा आदेष... 
प्रशासन स्तरावर चौकषा पुर्ण करुन जिल्हापरिषदेकडे अहवाल पाठविल्यानंतर संबंधित अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय येथे अंतिम मंजुरीसाठी पाठवावा लागतो. जिल्हाधिकारी सर्व माहिती घेवून जागेचे प्रयोजन पाहुन जागेचा आदेश करु शकतात. तसेच हा आदेश करताना शासकिय नियमांचा आधारच घ्यावा लागतो. आदेश झाल्यानंतर कागदोपत्री जागा सैनिक बाळु चौघुले यांना मिळू शिकते.

घरासाठी मदतीचे आवाहन
देशासाठी तळहातावर शिर घेवून देशाच्या रक्षणाची प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडणा-या सैनिकाला आपले हक्काचे घर बांधण्यासाठी आर्थिक स्थितीशी सामना करावा लागतो आहे. घरपाडल्याचा 2 लाख खर्च वाया गेल्यानंतर आता पुन्हा पैसे कसे उभे करावयाचे हा प्रश्न उभा ठाकला आहे. यासाठी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी जाहीर आवाहन केले असून मदतीसाठी बॅंक आॅफ इंडियाच्या दौंड शाखेचे खातेक्रमांक 20049693249 असा आहे.

संबंधित बातम्या :

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या