मतदान हा प्रत्येक नागरीकाचा अधिकार : साबळे

भांबर्डे,ता.२६ जानेवारी २०१७ (प्रा.एन.बी.मुल्ला) :  प्रत्येक मतदाराने मतदान केले पाहीजे.मतदान करणे हा प्रत्येक नागरीकाचा अधिकार आहे असे मत शिरूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी कल्याणराव साबळे यांनी व्यक्त केले.

भांबर्डे येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये मतदार जागॄती दिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात साबळे बोलत होते.भारताला स्वातंञ्य मिळाल्यापासून आजपर्यंत मतदान करून लोकप्रतिनिधी निवडले जातात त्यामुळेच भारताची लोकशाही जगात सर्वश्रेष्ठ आहे.

आजचे युवक हे राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत असेही यावेळी बोलताना साबळे यांनी सांगीतले.मतदार जागॄती दिना निमीत्त विद्याथ्र्यांची प्रभातफेरी काढली व मतदान जागॄती करण्यात आली.तसेच रांगोळी, निबंध, वक्तॄत्व व चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.यावेळी तालुका लागवड अधिकारी डी.एन.थोरात, वनरक्षक बी.एम.दहातोंडे, एस.एच.लवगे, मुख्याध्यापक मारूती कदम, सुरेश शेळके, बाळासाहेब दिवेकर, सविता शिंदे, रोहिदास इंगळे, नानाभाउ थोरात, पोपट मांढरे, लालासाहेब जगताप, विठ्ठल जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत एम.एस.कदम यांनी केले तर ज्ञानदेव गाडे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या