निवडणुकित कितपत खर्च करायची तयारी अाहे ?

शिरुर,ता.२६ जानेवारी २०१७ (सतीश केदारी) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मुलाखती सुरु असुन कितपत पैसे खर्च करायची तयारी अाहे असा सवाल केला जात असुन सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षश्रेष्ठींकडुन डावलले जात असल्याची इच्छुकांमध्ये चर्चा अाहे.

शिरूर तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणूकांची रणधुमाळी जोरात सुरु असुन अनेकांनी तिकिट शंभर टक्के मिळणार या अाशेने अाताच प्रचार जोरात सुरु केला अाहे.यंदाची निवडनुक हि चुरशीची निवडणुक होणार असल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजण अाताच दंड थोपटून उभे आहेत. परंतु, धनदांडग्यांच्या पुढे सर्वसामान्य कार्यकर्त्याची घुसमट होत असुन  आपलं सिट कितपत टिकेल ? असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनात घोळू लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन  पक्षासाठी काम केले. प्रसंगी पदरमोड करत वेगवेगळे कार्यक्रम अायोजित केले.पक्षाला जनमानसात वेगळा चेहरा देण्याचे काम केले अाहे.

परंतु, उमेदवारी देण्याची वेळ आली की माञ  पक्षातील ज्येष्ठ नेते आर्थिक परिस्थीतीचे कारण पुढे करत तिकीट देण्याचे टाळतात.मग पक्षाला नेमका अाताच कसा विसर पडतो असा सवाल सर्वसामान्य उमेदवारांकडुन होत असुन उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात अाहेत.

राजकारणापायी अनेकांची अार्थिक स्थिती खालावली असुन  त्यात कर्जबाजारी झाल्याची उदाहरणे समोर येत अाहेत.वर्षानुवर्षे पक्षाचे काम करूनही निवडणुकित संधी असताना किरकोळ अार्थिक कारण देत डावलले जात असल्याचे काहि कार्यकर्त्यांचे म्हणणे अाहे.त्याचबरोबर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पुढेपुढे करणे. सतत त्यांच्यासोबत फिरणे,उठबस करणे, वेळोवेळी विविध कार्यक्रम साजरे करणे, अश्यांनाच आज पक्षामध्ये मान मिळत असल्याचे चित्र जवळपास सर्वच पक्षांमध्ये दिसत आहे.

सध्या अनेक धनदांडगे पैशाच्या जोरावर हुकुमत गाजवत तिकीट मिळविण्यासाठी धडपड करताना पहायला मिळतात.  या निवडणूकीतही पैसा  हेच सुञ पक्षश्रेष्ठी वापरणार असतील तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी राजकारण सोडावे का? असा सवाल होत असुन प्रत्येकवेळी आर्थिक निकष लावला जाणार असेल तर आम्ही राजकारण सोडून घरी बसावे का? असा सवाल नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर एका कार्यकर्त्याने उपस्थित केला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या