अाचारसंहितेच्या धसक्यातच प्रजासत्ताक दिन साजरा

शिरुर,ता.२७ जानेवारी २०१७(विविध प्रतिनीधींकडुन) : अाचारसंहितेचे कठोरपणे पालन करत भारताचा ६८ वा प्रजासत्ताकदिन शिरुर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात अाला.

सकाळपासुनच शिरुर तालुक्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजपुजन करुन ध्वजारोहन करण्यात अाले.शिरुर येथील पोलीस स्टेशन,विद्याधाम प्रशाला,सरकारी शाळा, त्याच बरोबर विविध कार्यालये अादी ठिकाणी मान्यवरांनी ध्वजारोहन केले.तळेगाव ढमढेरे, मांडवगण फराटा, सादलगाव, वाघाळे, शिक्रापुर, कारेगाव, सणसवाडी, कोरेगाव भिमा, अादी गावांनी देखिल शांततेत ध्वजवंदन करण्यात अाले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका असल्याने व अाचारसंहिता असल्याने  अनेक ठिकाणी गाव पुढा-यांनी अाचारसंहितेचे काटेकोरपालन केले होते तर अाचारसंहितेचा अनेकांनी एकप्रकारे धसकाच घेतला असल्याचे विविध ठिकाणी प्रकर्षाने जाणवत होते.प्रजासत्ताक दिन असुनही सर्वञ शांतता व शुकशुकाट जानवत होता.दिवसभरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

मतिमंद मुलांच्या चेह-यावर उजळले हास्य

रामलिंग रोड लगत असलेल्या अाकांक्षा एज्युकेशनल फौंडेशन  या विशेष मतिमंद मुलांच्या संस्थेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे अायोजन करण्यात अाले होते.

शिरुर येथील सी.ए.अादेश गुंदेचा यांच्या हस्ते ध्वजपुजा करण्यात अाली तर मनसुख गुगळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात अाले.या वेळी मुलांनी व्यक्त केलेल्या भावनांनी उपस्थित भारावुन गेले.तर या वेळी खाउ वाटपानंतर मुलांच्या चेह-यावर अानंदाचे भाव जानवत होते.माहेर संस्थेत देखिल उत्साहाचे वातावरण होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या