अंधश्रद्धा निर्मुलनासाठी प्रयत्न करणार- खुशालचंद बोरा

शिरुर, ता.२७ जानेवारी २०१७ (सतीश केदारी) : समाजातील बुवाबाजी व अंधश्रद्धा समुळ नष्ट करण्यासाठी अागामी काळात प्रयत्न करणार असल्याचे शिरुर अंधश्रद्धा निर्मुलन समिती चे अध्यक्ष खुशालचंद बोरा यांनी सांगितले.

अंधश्रद्धा निर्मुलन समिती शिरुर शाखेच्या नवीन पदाधिका-यांची नुकतीच निवड करण्यात अाली.शिरुर येथे पार पडलेल्या एका बैठकित सर्वानुमते खुशालचंद बोरा यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राणीताई चोरे यांची निवड करण्यात अाली.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, समाजात अाजही जुन्या रुढींचा जबरदस्त पगडा असुन समाज पुढारलेला असुन देखिल बुवाबाजी व अंधश्रद्धेच्या मागे असल्याचे प्रकर्षाने दिसते.या सर्व गोष्टी समुळ नष्ट करण्याची अत्यंत अावश्यकता असुन मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे अाहे.अागामी काळात शिरुर शाखेच्या वतीने भरीव काम केले जाईल असेही संकेतस्थळाशी बोलताना ते म्हणाले.या वेळी विविध क्षेञातील मान्यवर अावर्जुन उपस्थित होते.

नियुक्त केलेली समिती पुढीलप्रमाणे :

अध्यक्ष :  खुशालचंद बोरा
उपाध्यक्ष :  राणीताई चोरे
कार्याध्यक्ष : क्रांती पैठणकर
सचिव : विक्रांत मल्लाव
बुवाबाजी संघर्ष कार्यवाहक : मोहन चव्हान
वैज्ञानिक जाणिव कार्यवाहक : रेश्मा साळवे
कायदेविषयक सल्लागार : अॅड.संजय वाखारे
महिला संघटक : साधना शितोळे
युवा संघटक : अमोल फुलावणे

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या