रुग्णसेवेचा घेतलेला वसा प्रेरणादायी: दिलीप वळसे पाटील

रांजणगाव गणपती, ता.२९ जानेवारी २०१७(सतीश केदारी) : सामान्य कुटुंबातील तरुणाने रुग्णसेवेचा घेतलेला वसा  प्रेरणादायी असल्याचे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.

रांजणगांव गणपती येथील श्री गजानन हॉस्पिटल या अद्ययावत व सर्व सुविधांनी सुसज्ज अशा रुग्णालयाचे उ्दघाटन  वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात अाले.त्या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले कि, रांजणगांव परिसरात पुणे-नगर महामार्गावर सर्व सुविधांनी परिपुर्ण दवाखान्याची अत्यावश्यकता होती.त्याचीच गरज ओळखुन सामान्य कुटुंबातील डॉ.अंकुश लवांडे या तरुणाने रुग्णसेवेत पुण्यासारख्या ठिकाणी सुमारे १५ वर्षे केलेली सेवा व त्यानंतर गावाकडील गरीब रुग्णांसाठी सुरु केलेले प्रयत्न हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले.

या वेळी विविध मान्यवरांनी दवाखान्यास भेट समाधान व्यक्त केले.डॉ.अंकुश लवांडे यांनी अालेल्या मान्यवरांचे अाभार मानले.या कार्यक्रमाला अामदार बापुसाहेब पठारे, माजी अामदार पोपटराव गावडे,मानसिंग पाचुंदकर, अादी मान्यवर उपस्थित होते.

गरीब रुग्णांवर  होणार माफक दरात उपचार 
रांजणगाव गणपती येथील पुणे-नगर हायवेलगत सर्व सुविधांनी परिपुर्ण असलेल्या श्री.गजानन हॉस्पिटल येथे गरीब रुग्णांसाठी विशेष सुविधा उपलब्ध केल्या असुन त्या अंतर्गत दुर्बिणी द्वारे शस्ञक्रिया, एक्स रे, इ.सी.जी, रक्त तपासणी, क्रिटीकल केअर, अादी सुविधा व विविध प्रकारच्या तपासण्या अत्यंत माफक दरात केल्या जाणार अाहेत.त्याचप्रमाणे वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने रुग्णांची विशेष तपासणी देखिल केली जाणार असुन अधिकाधिक गरीब व गरजु रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे डॉ.लवांडे यांनी संकेतस्थळाशी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या