गैरप्रकार करणा-यांना माफी नाही -राजेंद्र मोरे

शिरुर, ता.२९ जानेवारी २०१७(तेजस फडके) : निवडणुक काळात शिरुर तालुक्यात कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे असुन गैरप्रकार करणा-यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र  मोरे यांनी बोलताना सांगितले.

शिरुर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या होणा-या निवडणुकिच्या पार्श्वभुमीवर शिरुर पोलीस स्टेशन येथे नागरिकांची बैठक अायोजित करण्यात अाली होती.या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते  बोलत होते.

या वेळी परि.पोलीस उप अधिक्षक यमावार,तहसिलदार राजेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज नवसारे,तसेच विविध गावचे सरपंच, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

या प्रसंगी  तहसिलदार राजेंद्र पोळ बोलताना म्हणाले कि, निवडणुक अायोगाने घालुन दिलेल्या नियमांनुसार हि निवडणुक पारदर्शी व शांततेत पार पाडण्यासाठी प्रत्येकाने अाचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे अाहे.शंका व त्या संबंधी अडचणी असल्यास त्या शंकांचे निरसण केले जाईल.नागरिकांनी संयम राखत निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे अावाहन व उपस्थितांना निवडणुकिच्या संबंधी मार्गदर्शन केले.

पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर  करडी नजर असुन त्यांच्यावर कारवाई करण्याचे सुतोवाच करत निवडणुक नियमांचे उल्लंघन करणा-यांना सोडणार नसल्याचे सांगितले.या वेळी नागरिकांनी  देखिल  उत्स्फुर्त प्रतिक्रिया व्यक्त करत अनेकांनी शंकांचे निरसन केले. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या