धनदांडग्यांनाच निवडणुकित तिकिट मिळणार ?

करडे,ता.३० जानेवारी २०१७(सतीश केदारी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकित धनदांडग्यांनाच पुन्हा तिकिट मिळणार असुन निष्ठावान कार्यकर्त्यांना पुन्हा डावलले जाणार  असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या अाहेत.

शिरुर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकिसाठी जोरदार तयारी सुरु असुन इच्छुक उमेदवारांच्या नुकत्याच मुलाखती झाल्या अाहेत.त्या अनुषंगाने येत्या दोन दिवसांत अधिकृत उमेदवारांची यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता  वर्तवली जात अाहे.

निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर गेल्या अनेक दिवस छोट्या उमेदवारांपासुन बडे-बडे  इच्छुक उमेदवार देखिल 'अापल्यालाच उमेदवारी मिळावी'यासाठी देव पाण्यात घालुन बसले अाहेत.तर नुकत्याच झालेल्या मुलाखतीत काही भागांत जिल्हा परिषदेबरोबर पंचायत समिती च्या उमेदवारीसाठी अनेकांनी पक्षश्रेष्ठींना गळ घालुन खर्चाच्या गणितावर उमेदवारी मागितले असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.या सर्व कोलाहालात सर्व सामान्य कार्यकर्त्याची मोठ्या प्रमाणावर गळचेपी होत असुन वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांदी घेउन शेवटी ऐनवेळेस डावलले जात असल्याने पक्षनिष्ठा ठेवुन काय फळ मिळाले? अशा भावना काहि इच्छुकांनी अप्रत्यक्षरित्या व्यक्त केल्या अाहेत.

संकेतस्थळ 'शिरुर तालुका डॉट कॉम' ने नुकत्याच केलेल्या मतचाचणी व सर्व्हेत अनेक बाबी समोर येत असुन निवडणुक हि लोकाभिमुख न राहता अार्थिक बाब, घराणेशाही व व्यक्तिकेंद्रीत झाली असल्याचे स्पष्ट झाले अाहे.

नागरिकांनी देखिल नाव न छापण्याच्या अटीवर  अपेक्षित असणा-या विकासाच्या वल्गना करणा-या पुढा-यांच्या विषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या अाहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या