उमेदवारांचे फोटो प्रेम अालयं भलतचं उफाळुन !

शिरुर, ता.३१ जानेवारी २०१७ (सतीश केदारी) : इच्छुक उमेदवारांचं फोटो प्रेम सध्या भलतचं उफाळुन येऊ लागले असुन दारोदारी अन शेताच्या बांधावर फोटो घेउन सोशल मिडियावर टाकण्याचा नवा ट्रेंड अाला असुन अनेकांनी तसा सपाटाच लावला अाहे.

शिरुर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकिचा ज्वर दिवसेंदिवस चढत चालला असुन अनेक इच्छुक दादा, ताई, भाउ, प्रचाराच्या  निमित्ताने अापअापल्या गटातील व गणातील गांवे पिंजुन काढत अाहे.या वेळी इच्छुक उमेदवार ज्येष्ठांच्या थेट गाठीभेटी घेत असुन 'लक्षात राहु द्या' असे सांगत अाहेत.त्याचप्रमाणे उत्साही कार्यकर्त्यांडुन प्रचार करतानाचे, ज्येष्ठांच्या अशिर्वादाचे, सहभोजनाचे अशा विविध प्रकारचे फोटो काढत असल्याचे दिसत असुन ते फोटो सोशल मिडियावर टाकण्याचा भलताच ट्रेंड निर्माण झाला अाहे.

निवडणुकीनंतर कधीही न भेटलेल्या पुढा-यांची पावले सर्वसामान्यांच्या घरी थबकत असुन मिळेल ते जेवणाचा देखिल अाग्रह होउ लागल्याने सर्वसामान्य माञ या  अाग्रहाने भलतेच बुचकळ्यात पडत अाहेत.

एरवी भेटण्यास टाळाटाळ करणारे व फोन ला कधीही प्रतिसाद न देणारे पुढारी अाता माञ सर्वसामान्य मतदारांच्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देउ लागले असल्याने 'निवडणुक अाली कि हे भलते सलते प्रेम उफाळुन येणारचं' अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करु लागले अाहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या