...अन अजितदादांनाही अाले गहिवरुन

कोंढापुरी,ता.२ फेब्रुवारी २०१७ (विशेष प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात निवडणुकिच्या प्रचारासाठी येत असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बॅंकेचे माजी संचालक कै. अरुणआबा गायकवाड यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची अावर्जुन भेट घेत घेतली. जुन्या अाठवणीने दादांना ही गहिवरुन अाले होते.


या वेळी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे, युवक जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, डी. एल. नाना गायकवाड, अशोक गायकवाड, स्वप्नील गायकवाड, नितीन गायकवाड, अनिल देशमुख, अजय गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.
गायकवाड कुटुंबाकडुन माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांचा सन्मान करण्यात अाला.या केलेल्या स्वागताने दादा यावेळी भारावुन गेले.यावेळी  माजी सरपंच स्वप्नील गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबाची दादांनी आपुलकीने विचारपूस केली.

कै.अरुणअाबा यांनी राजकिय वाटचालीत वेळोवेळी दिलेली साथ अन समाजाप्रती असणा-या निष्ठेचे दादांनी यावेळी अावर्जुन उल्लेख करत सोबतच्या अनेक आठवणीने दादांना या वेळी गहिवरून आले. ते काही काळ भावनावशही झाले होते. शिरुर तालुक्यातील एका सच्चा व निष्ठावान कार्यकर्त्याला तालुका मुकला असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.त्याचप्रमाणे कमी वयात त्यांचा मुलगा स्वप्नील यांनी देखिल राजकिय व सामाजिक क्षेञात दिलेल्या योगदानाबद्दल दादांनी विशेष कौतुक केले.कै. आबांना जाऊन तीन वर्षे झाली, तरी त्यांची आठवण राजकीय व सामाजिक जीवनात आल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना पवार यांनी  व्यक्त केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या