वडगांव रासाई गटांत होणार चुरशीची लढत

वडगांव रासाई, ता.२ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : संपुर्ण जिल्हयाचे लक्ष लागुन राहिले असलेल्या वडगांव रासाई या जिल्हा परिषद गटांत 'कांटे कि टक्कर' होणार असल्याचे मानले जाते.

शिरुर तालुक्यात निवडणुकिचे पडघम वाजु लागले असुन तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण झाली अाहे.शिरुर च्या विकासात महत्त्वपुर्ण भुमिका  बजावणारे माजी अामदार अशोक पवार यांच्या सुविद्य पत्नी पंचायत समिती सदस्या सुजाता अशोक पवार यांच्याविरोधात घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील छाया  फराटे या उभ्या राहिल्या अाहेत.

वडगाव रासाई-मांडवगण फराटा हा गट पुर्वी पासुनच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो.निवडणुक कार्यक्रम जाहिर होण्यापुर्वीच या गटातील अनेक उलथापालथ झाली असुन मांडवगण फराटा व परिसरातील अनेक मातब्बर नेते मंडळी राष्ट्रवादीत दाखल झाली अाहे.त्याचप्रमाणे नाराज कार्यकर्ते देखिल पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले असल्याचे चिञ पहावयास मिळते.त्यामुळे सध्यातरी या गटात राष्ट्रवादीचेच पारडे जड झाले अाहे.

निवडणुक प्रचाराला कमी कालावधी असल्याने थेट घरोघरी जाउन उमेदवार मतदारांच्या गाठीभेठी घेण्यावर भर देत असुन प्रचाराला चांगलाच जोर येउ लागला अाहे.शिरुर च्या पुर्व भागात वडगांव रासाई गटांत इतिहासात प्रथमच महिलेला संधी मिळाली असल्याने या निवडणुकिला विशेष महत्त्व असल्याचे बोलले जात अाहे.भाजपाचे दादा पाटील फराटे यांच्यासाठी हि निवडणुक प्रतिष्ठेची बनली असुन तालुक्यापासुन केंद्रापर्यंत सत्ता असल्याने माजी अामदार अशोक पवार यांना ते कितपत शह देण्यात यशस्वी ठरतात याचीच सर्वांना उत्सुकता लागुन राहिली अाहे.

माजी अामदार अशोक पवार यांच्या बालेकिल्ल्यात होणा-या या लढतीला तालुक्याच्या राजकारणात वेगळेच महत्त्व प्राप्त झाले असुन या ठिकाणी 'कांटे कि टक्कर होणार' असेच मानले जात असुन संपुर्ण जिल्हयाचे लक्ष वडगांव रासाई या गटाकडे लागुन राहिले अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या