इच्छुक उमेदवारांची घालमेल वाढली; युतीचं काय?

शिरुर, ता.३ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अद्याप एकाही राजकीय पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर न केल्यामुळे  भाजपा-शिवसेना सह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अादी पक्षांचे इच्छुक अजूनही ‘गॅस’वर असल्याचे चित्र दिसत असुन तालुक्यात युतीचा होणारा निर्णय राजकिय समिकरणे बदलणारा ठरणार अाहे

राज्यपातळीवर भाजपा-शिवसेना युती तुटल्याने शिरुर तालुक्यात सत्ताधारी भाजपासोबत शिवसेना युती करणार कि स्वतंञ निवडणुक लढवणार यांवर तालुक्यातील सत्तेची समिकरणे अवलंबुन अाहे.

शिरुर तालुक्यातील बहुतांश जिल्हापरिषद गटांत  व पंचायत समिती गणांत शिवसेना उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरु केला अाहे.त्या अनुषंगाने मातब्बर नेते मैदानात उतरलेले अाहेत.काहि उमेदवार हे पक्षाच्या तर काहिंचा स्वतंञ चेहरा असल्याने ते देखिल अनेकांना धोबीपछाड करु शकतात.भाजपाच्या गोटात देखिल अशीच परिस्थिती असली तरी शिवसेना-भाजपा युती झाली तरच चिञ बदलु शकते असे बोलले जात अाहे.

जिल्हा परिषदेच्या चौदा जागांसाठी व पंचायत समिती च्या सात जागांसाठी तिकिटासाठी रस्सीखेच निर्माण झाली असल्याने व पक्षांतर्गत बंडाळी टाळण्यासाठी  पक्षश्रेंष्ठींनी देखिल सावध पविञा घेतला असुन अद्याप यादी जाहिर केलेली नाही.या मुळे इच्छुकांमध्ये मोठी घालमेल होत असुन गावपातळीवर व पक्षांतर्गत  जोरदार चर्चा झडु लागल्या अाहेत.

राष्ट्रवादी च्या गोटात उत्साहाचे वातावरण असुन  युती जर तालुक्यात नाहीच झाली तर राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार असुन अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच  निर्विवाद वर्चस्व गाजविणार असल्याची चर्चा अाहे.

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास (ता.१) पासून सुरुवात झाली असून  (ता.६) ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अखेरची मुदत आहे. शिरुर तालुक्यात गेल्या दोन दिवसांत सर्वच इच्छुकांनी सावध पविञा घेत  अद्याप अर्ज दाखल केलेले नाहीत.गुरुवारी अर्ज दाखल करण्याचा दुसरा दिवस होता, तर आता फक्त चारच दिवस उरले आहेत.

अशा परिस्थितीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांनी अद्याप एकही उमेदवार अथवा उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. त्यामुळे उरलेल्या चार दिवसांत नक्की काय निर्णय होणार आणि उमेदवारी कोणाला मिळणार हे स्पष्ट होणार असले, तरी हा वेळ फार कमी असल्याने इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडण्याची शक्यता असून, पक्षश्रेष्ठींकडून अद्याप हिरवा कंदील मिळाला नसल्याने सर्वच इच्छुक सध्या तरी ‘गॅस’वर आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या