सर्वांगिण विकासासाठी काम करणार-सुजाता पवार

शिरसगांव काटा, ता. फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील गावांचा राहिलेल्या विकासासाठी काम करणार असल्याचे शिरुर पंचायत समिती सदस्या सुजाता अशोक पवार यांनी बोलताना सांगितले.

प्रश्न : तुमचे उच्चशिक्षण झाले अाहे? काय सांगाल
माझे शिक्षण एम.ए झालेले अाहे.

प्रश्न : राजकारणाची अावड कशी निर्माण झाली ?
पुर्वीपासुनच समाजाच्या समस्या जवळुन अनुभवता अाल्या अाहेत.त्यातुनच समाजाचे देणं लागतो या कर्तव्यभावनेतुनच हळुहळु राजकारणाची गोडी निर्माण झाली.

प्रश्न : महिलांसाठी वेळोवेळी उपक्रम राबवत अाहात ?
परिसरातील महिलांसाठी नेहमीच मी वेगवेगळे उपक्रम राबवत अाले असुन वेळोवेळी बचतगटांना प्रोत्साहन दिले अाहे.त्याचबरोबर विधवा, परितक्त्या व वंचित महिलांना पंचायत समितीच्या विविध योजनांचा लाभ मिळवुन दिला अाहे. अार्थिक बाबीत महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले अाहेत.

प्रश्न : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत इच्छुक अाहात ?
होय. शिरुर तालुक्याचा पुर्व भाग हा सधन मानला जात असला तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी अाहे.अनेक भागांत युवक, महिला, शेतकरी, यांच्या समस्या वेगळ्या अाहेत.त्याचबरोबर माजी अामदार अशोक पवार यांच्यामुळे परिसराचा मोठ्या प्रमाणावर कायापालट जरी झाला असला तरी  विकासाचा उर्वरित अनुशेष भरुन काढण्यासाठी व जिल्हा परिषद गटाचा सर्वांगिन विकासासाठी वडगांव रासाई-मांडवगण फराटा या गटातुन सक्षम उमेदवार असणे गरजेचे अाहे.त्यासाठी जनतेच्या अाग्रहास्तव या निवडणुकित उभी अाहे.

प्रश्न : तुमची विकासाची ब्ल्यु प्रिंट काय ?
रस्ते, विज, पाणी, अारोग्य, शिक्षण या मुलभुत गरजा असुन या गरजा गटांत व गणात पुर्ण असल्याच पाहिजेत.तरीही अनेक भागांत माजी अामदार अशोक पवार यांच्या माध्यमातुन या पुर्ण करण्याचा प्रयत्न केलेला अाहे.ज्या भागांत अद्याप मागणी अाहे परंतु त्या त्या भागातील अडचणी समजुन घेउन त्या सोडविण्याचा  अागामी काळात प्रयत्न केला जाणार  अाहे.

प्रश्न : सध्याच्या राजकारणाबाबत काय वाटतं?
महिलांना राजकारणात अारक्षण मोठ्या प्रमाणावर मिळालं असली तरी अाजही महिलांमध्ये राजकारणाबाबत अज्ञान असल्याचे दिसते.तर पु्रुषसत्ताक राजकारणामुळे देखिल महिलांना राजकारणात वाव दिला जात नाही.पद हे फक्त शोभेसाठी घेउ नये तर ते समाजाच्या उद्धारासाठी उपयोग करता अालं पाहिजे.या वर्षी  अापल्या तालुक्यात महिलाराज अालं असुन पुरुषगसत्ताक पद्धत डावलुन महिलांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हि मोठी संधी अाली अाहे असे मला वाटते.

प्रश्न : नागरिकांना काय  अावाहन कराल ?
नागरिकांनी सर्वांगिण विकासासाठी सक्षम उमेदवार निवडुन देणं गरजेचं असुन विकासालाच साथ द्यावी हे अावाहन या निमित्ताने करु इच्छित अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या