चौथ्या दिवशी शिरुरला अाठ अर्ज दाखल

शिरूर,ता.५ फेब्रुवारी २०१७ (विशेष प्रतिनीधी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी चौथ्या दिवशी सुमारे जिल्हा परिषदेसाठी १ तर पंचायत समितीसाठी ७ असे एकूण ८  अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी दिली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या  चौथ्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी  वडगाव रासाई-मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटातून भाजपच्या उमेदवार छाया दादासाहेब फराटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.तर शिरूर ग्रामीण या पंचायत समिती गणातून अपक्ष संभाजी बाजीराव कर्डिले यांनी व गजानन खिराजी कुरंदळे यांनी कॉंग्रेस (आय)उमेदवारी अर्ज दाखल केला.

तसेच नाव्हरे या गणातून भाजपच्या ताई अरुण तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.पाबळ या गणातून कॉंग्रेस (आय) चे रावसाहेब मारुती वाघोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. रांजणगाव सांडस या गणातून भाजपकडून विजय सोमनाथ रणसिंग यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.त्यात एक उमेदवारी अर्ज अपक्ष आहे. मांडवगण फराटा या गणातून भाजपकडून राजेंद्र पोपटराव गदादे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या