रविवारी उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी झुंबड

शिरुर,ता.६ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकिसाठी शिरुर तालुक्यातुन रविवारी जिल्हा परिषद गटासाठी  १३ व पंचायत समिती गणासाठी २६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी दिली.उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी रविवार असुन देखिल उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.


शिरुर तालुक्यातुन  पंचायत समितीसाठी शिरुर ग्रामीण या गणातुन अरुण दादाभाउ घावटे(अपक्ष) तसेच भाजपाकडुन यांनी दोन अर्ज दाखल केले.तसेच अाबासाहेब ईश्वर सरोदे यांनी भाजपाकडुन दोन अर्ज दाखल केले.न्हावरे गणातुन अंजली शरद बांदल यांनी शिवसेनेकडुन तर मंगल संतोष लंघे यांनी एक अपक्ष व एक राष्ट्रवादी असा अर्ज दाखल केला.राणी बापु शेंडगे व  बायडाबाई गोरक्ष तांबे यांनी राष्ट्रवादीकडुन अर्ज सादर केले.कारेगाव गणातुन दादाभाउ भाउ खर्डे यांनी भाजपाकडुन उमेदवारी अर्ज दाखल केला.रांजणगांव सांडस या गणातुन अशोक बबन कोळपे यांनी राषट्रवादी व अपक्ष असे दोन फॉर्म भरले.विजय सोमनाथ रणसिंग(लोकशाही क्रांती अाघाडी),हनुमंत बापु काळे(राष्ट्रवादी),सुनिल लालचंद साञस (राष्ट्रवादी),यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.वडगांव रासाई या गणातुन उषा पोपट शेलार(शिवसेना), वैशाली प्रकाश शेलार(भाजप),प्रतिभा सोपान शेलार(राष्ट्रवादी), मनिषा किसन शेलार (राष्ट्रवादी), रेश्मा हनुमंत शेलार( राष्ट्रवादी), यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

मांडवगण फराटा गणातुन मच्छिंद्र शिवराम गदादे(शिवसेना), राजेंद्र पोपट गदादे( भाजप), शरद पोपट चकोर(राष्ट्रवादी), राजेंद्र पोपट गदादे(भाजप), मोहन  बबन गदादे(भाजप), लतिका  अानंदराव वराळे( राष्ट्रवादी) यांनी अर्ज सादर केले.

जिल्हा परिषद गटासाठी  शिरुर ग्रामीण न्हावरा गटातुन सुभाष बुधाजी कोळपे(कॉंग्रेस-अाय),रविंद्र रामचंद्र निंबाळकर(शिवसेना), संतोष भरत लंघे(राष्ट्रवादी),यांनी अर्ज दाखल केले.पाबळ केंदुर गटातुन यशोदा दत्ताञय कौटकर(जनता दल-सेक्युलर), मंगल भगवान शेळके(भाजपा), रेखा मंगलदास बांदल(अपक्ष), यांनी अर्ज दाखल केले.

शिक्रापुर सणसवाडी जिल्हा परिषद गटातुन रेखा मंगलदास बांदल(अपक्ष)यांनी दाखल केला.रांजणगांव सांडस तळेगांव ढमढरे गटातुन चेतना जयकुमार ढमढेरे(शिवसेना), शोभा पोपट वाघचौरे(कॉंग्रेस-अाय), रेखा मंगलदास बांदल(लोकशाही क्रांती अाघाडी) व वडगांव रासाई-मांडवगण फराटा गटातुन स्वाती शिवाजी मचाले(शिवसेना), सुवर्णा विभिषण फराटे(भाजपा), छाया दादापाटील फराटे(भाजपा)यांनी अर्ज दाखल केले.

रविवार हा तसा उमेदवारांसाठी धावपळीचाच दिवस ठरला  असुन अनेक पक्ष  कार्यालये कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलुन गेली होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या