संस्कारक्षम पिढीसाठी प्रयत्न गरजेचे-संदिप महाजन

शिरुर,ता.६ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात अाणुन संस्कारक्षम पिढीसाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत एल अॅंड टी कंपनी चे जनरल मॅनेजर संदिप महाजन यांनी बोलताना व्यक्त केले.

शिरुर येथील काचेअाळी या भागात झोपडपट्टीतील मुलांसाठी अहमदनगर येथील संकल्प प्रतिष्ठान ने सुरु केलेल्या 'माझी जीवन शाळा' या शाळेचा शुभारंभ संदिप महाजन यांच्या हस्ते  करण्यात अाला.या वेळी ते  बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, अाजच्या यंञयुगाच्या व धावपळीच्या जीवनात युवापिढीकडे समाजाकडे दुर्लक्ष होत असुन केवळ पुस्तकी ज्ञानातच ही पिढी गुरफटली जात अाहे.सामाजिक व व्यावहारिक कौशल्य देखिल प्रत्येक ठिकाणी मिळणे गरजेचे असल्याचे मत बोलताना त्यांनी व्यक्त केले.सामाजिक कार्यकर्ते रविंद्र धनक बोलताना म्हणाले कि,संकल्प प्रतिष्ठान ने सुरु केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक करताना नितेश बनसोडे यांनी सांगितले कि, शिरुर शहरातील झोपडपट्टी व परिसरात शिक्षणापासुन वंचित राहणा-या मुलांसाठी हा उपक्रम राबविला जाणार असुन त्याचबरोबर महिलांसाठी कापडी पिशव्या बनविणे, सॅनिटरी नॅपकिन अादी उपक्रम देखिल भविष्यात करण्याचा मानस अाहे.वंचितांना व निराधारांना स्वयंपुर्णतेसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी मायाताई गायकवाड,गुलाबदादा धाडिवाल, अाकांक्षा एज्युकेशन फौंडेशन च्या संस्थापिका राणी चोरे, एल अॅंड टी कंपनीचे मॅनेजर प्रदिप जोशी, संजोत महाजन,सामाजिक कार्यकर्ते अानंद गोसावी, वैशाली तिवारी,सतीश केदारी, बचत गटाच्या परवीन शेख,जनाबाई मल्लाव, अादी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुञसंचालन संजय बारवकर यांनी केले तर अाभार नितेश बनसोडे यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या