विनयभंगप्रकरणी दोघांना दंडासह सहा महिन्यांची शिक्षा

शिरूर, ता.७ फेब्रुवारी २०१७(प्रतिनीधी) : अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी  दोघांना शिरूर न्यायालयाने सहा महिन्यांची कैद व एकाला वीस हजार, तर दुसऱ्याला दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सविस्तर माहिती अशी कि, कारेगाव (ता. शिरूर) येथील एका खासगी इन्स्टिट्यूटमध्ये संबंधित महाविद्यालयीन विद्यार्थिनी संगणकाचे प्रशिक्षण घेत होती. यादरम्यान या इन्स्टिट्यूटमध्ये शुभम किशोर राऊत (रा. कारेगाव, ता. शिरूर) व स्वप्नील सीताराम वाळके (रा. बाभूळसर बुद्रुक, ता. शिरूर) हेदेखील संगणक प्रशिक्षणासाठी येत होते. 27 मे ते 29 मेदरम्यान या दोघांनी संबंधित मुलीची छेडछाड केली. छेडछाड व चिडवाचिडवी केल्याने संबंधित मुलीने रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती.

शिरुर न्यायालयात सुनावणीअंती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आर. एन. खान यांनी शुभम राऊत यास सहा महिने साधी कैद व वीस हजार रुपये दंड, तर स्वप्नील वाळके यास सहा महिने साधी कैद व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास पुन्हा एक महिना साधी कैद अशीही शिक्षा सुनावली. नुकसानभरपाई म्हणून दंडाच्या रकमेतून सुमारे 25 हजार रुपये फिर्यादी मुलीस देण्याचा महत्त्वपूर्ण आदेशही खान यांनी दिला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या