विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुक-अशोक पवार

शिरुर, ता.७ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : शिरुर तालुक्यात दोन वर्षांत विकासाच्या बाबतीत झालेली पिछेहाट गंभीर असुन यावरच निवडणुक लढवली जात असल्याचे शिरुर-हवेलीचे माजी अामदार अशोक पवार यांनी पञकारांशी बोलताना स्पष्ट केले.

शिरुर तालुक्यातील विद्यमान अामदारांचे काम हे शुन्य असुन दिशाहीन नेतृत्वाचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला अाहे.चासकमान कालव्याच्या अावर्तनाबाबत ढिसाळ नियोजन असल्याने पाणी वाटपात पुर्व भागाला वारंवार अन्याय सहन करावा लागला अाहे. उन्हाळ्यात पिके जळाली अाहेत.पारगांव पुलाचे काम त्वरीत होणे गरजेचे होते परंतु त्या दुरुस्तीला देखिल वेळ लागल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले अाहेत.

केंद्रसरकारच्या चुकिच्या धोरणामुळे शेतमालाचे बाजारभाव कोसळले असुन शेतमाल कवडीमोल दराने माल विकावा लागत  अाहे.नोटबंदीचा फटका बसुन अनेक  कामगारांवर उपासमारीची वेळ अाली तर अनेकांना घरी बसावे लागले.राज्यसरकारने दिवसा विज देण्याची घोषणा केली परंतु तीही फेल गेली अाहे.रावसाहेबदादा सहकारी साखर कारखान्याने १०० कोटीचा वीज प्रकल्प उभा केला परंतु केंद्र सरकार वीज खरेदी करण्यास नकार देत अाहे.

महाराष्ट्रातील २० सहकारी कारखान्यांना केंद्र सरकारच्या अाडमुठे धोरणाचा फटका बसत असुन त्याचा तोटा शेतक-यांनाच होतो अाहे.साखर धोरणबाबत देखिल धरसोडपणा व हलगर्जीपणा सरकारकडुन केला जात असुन या सरकारमुळे सहकार तोटयात येउ शकतो असेही मत त्यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना ते म्हणाले कि,शिरुर तालुक्यातील नवीन सोसायट्या 'त्यांनी' नियम धाब्यावर बसवुन जवळच्याच लोकांना दिल्या असुन याबाबत काही सोसायट्यांवर अाम्ही स्थगिती मिळवली  अाहे.तसेच न्यायालयात देखिल लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक ही तालुक्याच्या विकासावरच केंद्रित असुन याच मुद्दयावर लढवणार असल्याचे त्यांनी संकेतस्थळwww.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या