उच्चशिक्षित युवकांना राजकारणात संधी मिळावी-बांदल

करडे,ता.१० फेब्रुवारी २०१७(सतीश केदारी) : उच्चशिक्षित युवक युवतींना राजकारणात संधी दिली तर समाजात विकासाचे पर्व नक्कीच निर्माण होइल असे मत न्हावरा पंचायत समिती गणातील  शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार अंजलीताई शरद बांदल यांनी www.shirurtaluka.com या संकेतस्थळाशी बोलताना व्यक्त केले.

अंजलीताई शरद बांदल यांनी  अांबळे व परिसरात नागरिकांची भेट घेतली. महिलांशी थेट संवाद साधला. या वेळी त्यांनी विविध विषयांवर अापले विचार व्यक्त केले.

प्रश्न :तुमचे शिक्षण किती ?

माझे शिक्षण बी.एस.एल.एल.बी इतके असुन सध्या वकिलीच्या दुस-या वर्षात शिकत अाहे.

प्रश्न :राजकारणात का उतरायचं ठरवलं?
तशी अामच्या घराला अद्याप राजकारणाची कुठलीही पार्श्वभुमी नाही.तसेच कोणालाही फारसा राजकारणाचा  अनुभव नाही.परंतु समाजातील अन्याय,अत्याचार अादी विविध विषय वकिली व्यवसायामुळे जवळुन अनुभवत असल्याने व अापणंही समाजाचे देणं लागतो याच कारणाने राजकारणात उतरायचे ठरवले अाहे.सध्या मतदारांचा ही चांगला प्रतिसाद मिळत अाहे.

प्रश्न :महिलांच्या राजकारणाबाबत  तुमचे मत काय?
शिरुर तालुक्यात प्रथमच महिलांना संधी मिळाली अाहे हे जरी खरे असले तरी बहुतांश पतिराज हेच राजकारणात महिलांची राजकारणात जागा चालवतात.राजकारणात महिलांनी स्वतंञ अस्तित्व निर्माण करणे गरजेचे अाहे.

प्रश्न :उच्चशिक्षितांनी राजकारणात उतरावे असे वाटते?
हो.निश्चितच उच्चशिक्षित युवक-युवतींनी राजकारणात उतरल्याशिवाय सध्याच्या राजकारणाचा चेहरा बदलणार नाही.राजकिय व्यवस्था व प्रशासन सुधरायचे असेल तर उच्चशिक्षित युवतींनी राजकारणात उतरावे.

प्रश्न :कमी वयात राजकारणात तुम्ही राजकारणात उतरला अाहात?
होय.मी पुण्यात वकिलीचे अद्याप शिक्षण घेत असुन या निवडणुकितील सर्वांत उच्चविद्याविभुषित उमेदवार  अाहे.त्याचबरोबर कमी वयात राजकारणात येण्याचा केवळ प्रशासनात सुधारणा हाच प्रामाणिक हेतु अाहे.

प्रश्न :तुम्हांला पाठिंबा  कोणाचा अाहे  ?
माझे पती अॅड.शरद बांदल यांचाच मला मोठा पाठिंबा असुन कुटुंबाची देखिल मोठी साथ लाभत अाहेत.

प्रश्न : विकासाची तुमची ब्ल्यु प्रिंट काय अाहे?
शिवसेना पक्षावर ठेवलेली निष्ठा व अातापर्यंतचे काम पाहुन दिलेल्या संधीचे निश्चितच सोने करणार असुन प्रशासनातील चंगळवाद,भ्रष्टाचार अादी गोष्टी थांबवण्यास प्राधान्य देनार असुन त्याचबरोबर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यावर न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.सर्वसामान्यांच्या कोणत्याही अडी-अडचणी सोडविण्याचा निश्चितच प्रयत्न करणार अाहे.

प्रश्न : मतदारांना अावाहन काय कराल?
उच्चशिक्षित व पारदर्शी कारभारासाठी मतदारांनी संधी द्यावी व भविष्यात देखिल उच्चशिक्षित युवकांनाच पक्षाने संधी द्यावी एवढेच अावाहन करेल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या