तळेगांव जिल्हा परिषद गटांत प्रचाराचा धुराळा उडणार

तळेगाव ढमढेरे,ता.११ फेब्रुवारी २०१७ (जालिंदर अादक) :  जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या प्रचारासाठी उमेदवारांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली असून आता प्रचाराचा  धुराळा उडायला सुरुवात झाली अाहे

जिल्हा परिषदेच्या गटासाठी व पंचायत समिती च्या होणा-या निवडणुकिसाठी  तळेगाव याजिल्हा परिषद गटात सर्वसाधारण स्त्रीसाठी  आरक्षण आहे तर  पंचायत समिती गणासाठी तळेगाव साठी सर्वसाधारण महिला व रांजणगांव गणासाठी मागास प्रवर्ग पुरुष असे अारक्षण अाहे.

तळेगाव- रांजणगाव सांडस या जिल्हा परिषद गटात अंकिता प्रतिक ढमढेरे या राष्ट्रवादीकडुन,भाजपाकडुन विद्या राजेंद्र भुजबळ,शिवसेनेकडुन चेतना जयकुमार ढमढेरे, तर अपक्ष राजेश्वरी सुनिल वडघुले, रेखा मंगलदास बांदल, अादी इच्छुक अाहेत.पंचायत समिती गणासाठी तळेगाव ढमढेरे गणातुन  रोहिणी अभिषेक नरके या राष्ट्रवादीकडुन, हेमा हरिभाउ जेधे या भाजपाकडुन, अपक्ष म्हणुन अर्चना भानुदास भोसुरे, छाया हनुमंत लांडे या शिवसेनेकडुन उभ्या राहिलेल्या अाहेत.

रांजणगांव सांडस पंचायत समिती गणातुन काळुराम पुणेकर हे भाजपकडुन, चिंतामन विष्णु येळे (शिवसेना) तर सुनिल लालचंद साञस हे राष्ट्रवादीकडुन निवडणुक लढवत अाहेत.

भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांसह शिवसेना व अपक्ष उमेदवार देखिल उभे राहिले असुन या गटात व दोन पंचायत समिती गणात अटीतटीच्या लढती पाहावयास मिळणार अाहेत.अनेक पक्षांनी उमेदवारांना शेवटपर्यंत एबी फॉर्म न दिल्याने नाराजांचा गट देखिल या जिल्हा परिषद गटात मोठा निर्माण झाला असुन त्याचा  राष्ट्रवादी ला फायदा होणार का ? याच्या चर्चा परिसरात होताना दिसत अाहे. भाजप व राष्ट्रवादी च्या उमेदवारांना  लोकं पसंत करतात कि अपक्ष हे गणित राजकीय जाणकारांना माञ सुटलेले नाही.

या गटात अटितटीची लढत होणार असली तरी जे अपक्ष ते देखिल या पुर्वी प्रमुख पक्षाचेच कार्यकर्ते असल्याचे मानले जाते.त्यामुळे  पक्षप्रतिष्ठा बाजूला ठेऊन उमेदवारांनी भावकी,गावकी,नातलग एकत्र येऊन लढण्याची भक्कम तयारी दाखवली आहे.सध्या प्रचारात विविध उमेदवारांचा प्रचाराचा नारळ फुटुन सुरु झालेला प्रचाराचा  धडाका पहाता  ३७ हजार च्या अासपास मतदान असणारा या गटातील मतदार राजा कोणाच्या बाजूला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या