बहुजन समाजाने एक व्हावे : वृशाली विशाल घायतडक

करडे,ता.११ फेब्रुवारी २०१७ (प्रतिनीधी) : बहुजन समाजाने वारंवार होणा-या अन्यायाविरुद्ध एक होण्याची हिच योग्य वेळ असल्याचे मत न्हावरे पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार वृशाली विशाल घायतडक यांनी www.shirurtaluka.comशी बोलताना व्यक्त केले.

न्हावरा या नावाने नव्याने तयार झालेला गण हा ओबीसी महिला यासाठी आरक्षित झाला असुन, या गणामध्ये प्रामुख्याने करडे, अांबळे, कळवंतवाडी, न्हावरे, कोहोकडीवाडी, शिंदोडी, गुणाट, चिंचणी, हि गावे समाविष्ट होतात.या गणाची नव्याने रचना झालेली असुन न्हावरे सह वरील इतर गावे जोडली गेलेली अाहेत. बहुजन समाजावर वारंवार होणा-या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हिच योग्य वेळ अाली असल्याचे त्यांनी सांगितले.

न्हावरे गणामध्ये करडे येथील ग्रामपंचायत सदस्य श्री. विशाल घायतडक यांच्या पत्नी वृषाली या अपक्ष उमेदवार म्हणुन निवडणुक लढवत असुन जोरदार प्रचार सुरु अाहे.पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि उच्चशिक्षितांनाच संधी देणे गरजेचे असुन घराणेशाही संपुष्टात अाली पाहिजे.विकासाच्या बाबतीत दाखवलेली वस्तुस्थिती व प्रत्यक्षातील परिस्थिती यात विरोधाभास असल्याचे जाणवत अाहे. गावपातळीवर दिलेला शब्द पाळला नाही. तसेच नेतेमंडळींनी कायमच दुर्लक्ष केल्याने न्याय मागायचा तरी कोणाकडे असा सवाल करत अपक्ष म्हनुन बंड पुकारले अाहे.

न्हावरे गणातील जनतेने सर्वांगिन विकासासाठी  संधी दिली तर या वेळेस अाणखीन जोमात काम करु असे घायतडक यांनी संकेतस्थळाशी बोलताना सांगितले.

करडे ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणुन विशालभाऊ घायतडक यांनी काम केले असुन  मुळचा राजकिय वारसा लाभला अाहे. त्यांच्या मातोश्री सौ. रुक्मिणी निळकंठ घायतडक या करडे गावच्या प्रथम महिला सरपंच होत्या.तसेच विशालभाऊ घायतडक यांनी विविध माध्यमांतुन त्यांच्या वॉर्डात अनेक विकासकामे केली अाहेत, गावात अंतर्गत रस्ते, दलितवस्ती सुधार योजना,पाणी अडवा पाणी जिरवा च्या अंतर्गत बंधारे, प्राथमिक आरोग्य केंद्र, वॉलकंपाउंड अादी दर्जेदार कामे करुन चांगल्या कामाची या विकासकामांच्या माध्यमातुन चुणुक दाखवली अाहे.

घरातुनच समर्थ राजकिय वारसा व गावातील जाणत्या व जेष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाखाली संधी मिळाल्यास चांगली विकासकामे करु  असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या