तळेगावच्या सभेत अजितदादांची फटकेबाजी

तळेगांव ढमढेरे,ता.१५ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : सर्वसामान्यांच्या जीवनाशी या सरकारला फारसे घेणे-देणे नसुन हे बोलुन चालुन फकिरच असल्याचे सांगत अजित पवारांनी केंद्रसरकार व पंतप्रधानांवर कडाडुन टिका केली.या वेळी अजितदादांच्या फटकेबाजीने सभेत चांगलीच रंगत अाली.

तळेगांव ढमढेरे(ता.शिरुर) येथे राष्ट्रवादी चे उमेदवार प्रा.रोहिणी अभिजित नरके, अंकिता प्रतिक ढमढेरे, सुनिल लालचंद साञस या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते  करण्यात अाला.या वेळी प्रचारसभेत ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले कि,या सरकारने विविध योजना व कायदे अाणले परंतु ते सर्वच चुकिचे ठरले असुन नोटाबंदीमुळे शेतक-यांचाच मोठा तोटा झाला असुन ९५ दिवसानंतरही परिस्थिती सुधारली नाही.कॅशलेस करण्याचे ठरवले परंतु लोकांना मोबाईल नंबर लक्षात राहत नाही तर त्या कार्डाचा नंबर काय लक्षात राहणार असा सवाल करत स्मार्ट सिटी,मेक ईन इंडिया ही नावं गोरगरिब जनतेला तरी कशी कळणार? जरा मराठीत तरी बोला.

या वेळी केंद्र सरकार व राज्यसरकार च्या कारभारावर टिका करत  या सरकारने केवळ अाश्वासनांचेच गाजर दाखवलं असुन अाम्ही करुन दाखवलं तर यांनी बिघडवलं असे सांगितले.

माजी अामदार अशोक पवार बोलताना म्हणाले कि,माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या मुळे शिरुर तालुक्यासाठी ५५० कोटीच्या वर निधी मिळविता  अाला.परंतु गेल्या अडीच वर्षात तालु्क्यात विकासाच्या केवळ वल्गना केल्या जात असुन विद्यमान अामदार हरवले कि काय अशीच शंका  वाटु राहिली अाहे.त्यामुळे जनता देखिल या वेळी भुलणार नाही असे ते म्हणाले.

या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे,प्रवक्ते विकास लवांडे,तालुकाध्यक्ष रविबापु काळे, पं.स.सभापती सिद्धार्थ कदम,शहराध्यक्ष रंजन झांबरे,अारती भुजबळ, व अधिकृत शिक्रापुर-सणसवाडीचे उमेदवार  उपस्थित होते.माञ अजितदादांच्या झालेल्या फटकेबाजीने श्रोत्यांमध्ये चांगलाच हशा काहिकाळ पिकला होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या