पञकारांचा अपमान..निषेध..अन पुन्हा माफीनाट्य

शिरुर, ता.१६ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : शिरुर नगरपालिकेच्या काल झालेल्या स्विकृत सदस्य निवडीवेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षांकडुन पञकारांचा अपमान करण्यात अाला परंतु काहि काळाने या वादावर माफी मागुन पडदा टाकण्यात अाला.

सविस्तर वृत्त असे कि,काल(ता.१५) रोजी स्विकृत सदस्य निवडीसाठी सभा बोलाविण्यात अाली होती.या वेळी वार्तांकन करण्यासाठी जमलेल्या पञकारांना नगराध्यक्षा तथा पिठासीन अधिकारी वैशाली वाखारे यांनी,तुम्ही इथे थांबु नका असे सांगत बाहेर जाण्यास सांगितले.या झालेल्या गोष्टींचा शिरुर शहरातील पञकारांनी एकञ येत काळ्या फिती लावुन निषेध केला.

यानंतर झालेल्या प्रकाराबद्दल पालिकेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी माफी मागितली.शेवटी चहापानाअंती वादावर पडदा टाकण्यात अाला.

सभागृहात झालेल्या अपमान व निषेध अन माफीनाट्याने कालचा दिवस चांगलाच  गाजला तर याची दिवसभर शिरुर शहरात चर्चा चांगलीच रंगली होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या