विद्यमान आमदारांच्या गप्पाच ऐकाव्या लागतात-पवार

मांडवगण फराटा, ता.१६ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : "विद्यमान आमदारांना जनतेची कामे करण्यासाठी वेळ नसून त्यांचा सर्वाधिक वेळ हा सातबारा पाहण्यात व एमआयडीसी मध्येच जात आहे. त्यांच्याकडून हजार कोटीची कामे आणल्याचे सांगीतले जाते. मात्र, लोकांना त्यांच्या हजार कोटींच्या गप्पाच ऐकाव्या लागत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अशोक पवार यांनी केले. ते मांडवगण फराटा येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेच्या कोपरा सभेत बोलत होते.

विरोधकांकडून घोडगंगा कमी बाजार भाव देत असल्याचे भासवले जात असून प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी अाहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी जाहीर केलेल्या ऊस दरापैकी पहिली उचल दिलेली असुन सर्व कारखान्यांकडून उर्वरीत रक्कम दुसऱ्या टप्प्यात दिली जाणार आहे. छत्रपतीने २५०१ रुपये जाहीर करून २४०० रुपये, माळेगावने २७५० जाहीर करून २३९६, सोमेश्वरने २७५० सांगून २४००, इंदापुरने २५०५ जाहीर करून २१००, नीरा भीमाने २५०५ जाहीर करून २१००, घोडगंगाने २५५० जाहीर करून २३००, विघ्नहरने २५५० जाहीर करून २२२३, भीमाशंकरने २५५० जाहीर करून २३००, संत तुकारामने २५५० जाहीर करून २२२७ रुपये ऊस उत्पादकांना दिले आहेत. सध्याची साखरेची परिस्थिती पाहता कारखान्यांनी जाहीर केलेल्या दरापेक्षाही जास्त दर सर्वच कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना मिळू शकतो, असेही पवार यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, शिरूर तालुक्याचा विकास गेल्या अडीच वर्षांपासून खुंटला असून डीपीडीसीचे पुणे जिल्ह्याचे बजेटच ४६० कोटींचे आहे तर एकट्या शिरूर तालुक्याला एक हजार कोटी कसे दिले जातील? गेल्या अडीच वर्षात या भागात साधा रस्ताही करता आला नाही.विकासाच्या गप्पा मारून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम विद्यमान आमदारांकडून केले जात आहे. माझ्या आमदारकीच्या काळात रेशनिंग मध्ये पारदर्शकतेसाठी बायोमेट्रिक योजना, शुद्ध पाण्यासाठी आर.ओ.ची संकल्पना, धरणाच्या खोलीकरणासाठी शेतकऱ्यांना गाळ मोफत नेण्याची परवानगी, शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या यांसारखे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.

याप्रसंगी  उमेदवार सुजाता पवार, लतिका वराळे, संगीता शेवाळे, विद्या भुजबळ, बाबासाहेब फराटे, सुधीर फराटे, जगन्नाथ जगताप, मनिषा सोनवणे, सुरेखा जगताप, प्रतिक्षा जगताप, प्रतिभा बोत्रे, राजेंद्र जगताप, प्रवीण जगताप, सुनील चव्हाण, शैलेश घाडगे, नितीन फराटे, तुकाराम थोरात यांची भाषणे झाली. दत्तात्रेय फराटे, जगन्नाथ फराटे, शरद चकोर, शंकर फराटे, सुदाम साठे, सीमा फराटे, माणिकराव फराटे, दिलीप फराटे, कैलास फराटे, बाबूराव फराटे, नानासाहेब फराटे, योगेश फराटे, मोहन फराटे, दिगंबर फराटे, धनंजय फराटे, विठ्ठल फराटे, अंकुश शितोळे उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या