शिवसेनेचे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात खडे अाव्हान

वडगांव रासाई, ता.१७ फेब्रुवारी २०१७(सतीश केदारी) : शिवसेनेने राष्ट्रवादीच्या बालेकिल्लयात डरकाळी टाकत खडे अाव्हान निर्माण केले अाहे

संपुर्ण जिल्हयाचे लक्ष लागुन असलेल्या वडगांव रासाई-मांडवगण या जिल्हा परिषद गटात पहिल्यांदाच मातब्बर उमेदवार रिंगणात उतरले असुन वडगांव रासाई पंचायत गणात शिवसेनेचे तालुकाध्यक्ष पोपट शेलार यांच्या पत्नी उषा पोपट शेलार या उभे अाहेत.इनामगांव येथील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते शिवाजी मचाले यांच्या पत्नी स्वाती शिवाजी मचाले जिल्हा परिषद गटासाठी तर मच्छिंद्र  गदादे हे मांडवगण गणासाठी उभे राहिले असुन या उमेदवारांना  परिसरात नागरिकांचा  जोरदार प्रतिसाद देखिल मिळत अाहे.

शिवसेनेच्या उमेदवार उषा पोपट शेलार,स्वाती मचाले,व मच्छिंद्र गदादे यांच्याशी थेट संपर्क साधला असता शिरुर च्या पुर्व भागात वर्षानुवर्षे जनतेला कोणताच पर्याय नव्हता.परंतु या निमित्ताने नवा पर्याय उपलब्ध झाला असुन नागरिक देखिल मनमोकळ्या भावना व्यक्त करु लागले अाहेत.जनतेने या वेळेस  संधी द्यावी असे अावाहन देखिल त्यांनी या वेळी केले.

प्रचारासाठी कालावधी हा अत्यल्प असुन पुर्व भागात प्रचार शिगेला पोहोचला असुन कोपरा सभा,नेत्यांचे अारोप-प्रत्यारोप झडु लागले अाहेत.शिरुर च्या पुर्व भागात शिवसेनेने मातब्बर उमेदवार उभे करत वाघाची डरकाळी टाकत  खडे केलेले अाव्हान बालेकिल्ल्यात भाजपाला फटका बसणार का? राष्ट्रवादी च्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार का ? हाच सवाल जनतेच्या चर्चांमध्ये होउ लागले अाहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या