विकासकामांत कुठेच कमी पडणार नाही-राजेंद्र जगदाळे

करडे, ता.१८ फेब्रुवारी २०१७(सतीश केदारी) : जनतेने संधी दिल्यास विकासकामांत कुठेच कमी पडणार नाही असे शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी चे उमेदवार राजेंद्र जगदाळे यांनी बोलताना सांगितले.

शिरुर तालुक्यात सर्वाधिक चर्चेत असलेला गट म्हणुन शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद ओळखला जात असुन संपुर्ण जिल्हयाचे लक्ष याच गटाकडे लागले असुन लक्षवेधी लढत होत अाहे.

राजेंद्र जगदाळे हे करडे गावचे माजी सरपंच असुन त्यांच्या पत्नी कविताताई जगदाळे या विद्यमान सरपंच अाहेत.राजेंद्र जगदाळे यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले कि, लहानपणासुनच समाजसेवेची अावड निर्माण झाली होती.त्यातुन समाजाचे देणं लागतो याच भावनेतुन काम सुरु केले.यामुळे अनेक गोरगरिब जनतेपर्यंत पोहोचता अाले.हळुहळु जनतेने ही अापलेसे केले.त्याचबरोबर सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला असुन गरीबीची तमा न बाळगता उद्योग व्यवसाय करायचे ठरवत उद्योगाकडे वळलो.यात यश मिळत गेले.त्याचबरोबर समाजसेवेची अावड असल्याने तो छंदच बनला.शिरुर चे माजी अामदार अशोक पवार व राजेंद्र जासुद यांच्यामुळेच राजकारणात पाउल ठेवले.सर्वप्रथम ग्रामपंचायत च्या माध्यमातुन निवडणुक लढविली अन त्यात गावातील सर्वांनी अक्षरश:  खांद्यावर घेतले व गावचे सरपंच पद भुषविण्याची संधी मिळाली.या मिळालेल्या संधीचे सोने करत गावात दर्जेदार कामे करुन दाखविले.गावात एकप्रकारे विकासपर्व निर्माण केले असुन त्याचे सर्वच साक्षीदार अाहेत.

शिरुर चे अामदार बाबुराव पाचर्णे यांचे पुञ जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे हे विरोधात उभे अाहेत यावर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी सांगितले कि,हि  विरोधातील उमेदवारांच्या जिल्हा परिषदगटात त्यांनी जेवढा विकास त्यांच्या कार्यकालात केला त्याच्या कितीतरी पटीने एकट्या करडे गावात विकास केलेला अाहे.

हि लढाई अामदार पुञ विरुद्ध शेतकरी पुञ अशी असली तरी विरोधात कोण अाहे हे महत्त्वाचे नसुन दर्जेदार विकासकामे कोण करतो व जनतेच्या प्रत्येक सुखदु:खात प्रत्येकवेळी कोण कामाला येतो हे महत्त्वाचे अाहे.त्यामुळे त्याची पर्वा कधी केलीच नाही.जनतेने या वेळेस  संधी दिल्यास परिसराचा संपुर्ण चेहरामोहरा बदलण्यास प्राधान्य देणार असल्याचेजिल्हा परिषदेचे उमेदवार जगदाळे यांनी सांगितले.  

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या