मुख्यमंञीसाहेब ३०२ कोणावर दाखल करायचा ?- सुरेश धस

निमोणे, ता.१९ फेब्रुवारी २०१७(सतीश केदारी) : अाघाडी सरकारच्या काळात वारंवार शेतकरी अात्महत्याबाबत ३०२ दाखल करायची मागणी केली जायची मग महाराष्ट्रात इतक्या शेतकरी अात्महत्या झाल्यात तर अाता कोणावर ३०२ चा गुन्हा दाखल करायचा असा खडा सवाल माजी मंञी सुरेश धस यांनी निमोणे येथील प्रचारसभेत बोलताना केला.

निमोणे(ता.शिरुर) येथे शनिवारी (ता.१८) रोजी सायंकाळी राष्ट्रवादी चे जिल्हा परिषदेचे उमेदवार राजेंद्र जगदाळे पाटील, पंचायत समिती चे उमेदवार शामकांत वर्पे, राणी शेंडगे यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, राज्यातील व केंद्रातील सत्तेतील नेत्यांची जीभ दिवसेंदिवस घसरत चालली असुन बेताल वक्तव्ये केली जात अाहे.शेतक-यांच्या कोणत्याही प्रश्नाचे या सरकारले देणे घेणे नाही.हे गरीबांचे सरकार नसुन नालायक  सरकार असल्याची कडकडीत टिका त्यांनी केली.कांद्यासाठी १ रुपयांचे अनुदान देत ' १ रुपया तेलाला दिला गं बाई अांबाच्या नावाला' असे सांगत सभेत अांबाबाईचे गाणंचं सादर केल्याने एकच हशा पिकला.तृतीयपंथी व भिका-यांपेक्षा देखिल वाईट स्थिती या सरकारने केली असल्याचे त्यांनी सांगितले.

रामदेव बाबा यांच्यावर टिका करत पतंजली च्या नावाखाली भुलभुलैया सुरु असुन शुद्ध फसवणुक सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.शिरुर च्या अामदारांवर टिका करत अामच्यावर घराणेशाहीची टिका केली जात असताना अाता घराणेशाही कुणाची सुरु अाहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
माजी राज्यमंञी सुरेश धस यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारवरनोटबंदी,शेतमालाचे पडलेले बाजारभाव,गोहत्याबंदी,चुकिची धोरणे सडकुन टिका केलीच परंतु अागळ्या वेगळ्या विनोदी शैलीत भाषण केल्याने अनेकांची मने जिंकली. तर निमोणे गावात प्रथमच गर्दीचा विक्रम मोडला असल्याची चर्चा सभेनंतर रंगली होती.

या वेळी तालुकाध्यक्ष रविंद्र काळे,जिल्हा परिषद सदस्य मनिषा कोरेकर, विलास कर्डिले,भरत चोरमले,कृष्णा माने अादींची भाषणे झाली.

अाम्ही तमासगिरासारखेच
पुढे खुमासदार शैलीत बोलताना ते म्हणाले कि अामची अवस्था देखिल तमासगिरासारखीच असुन बारागावचे पाणी पित फिरावे लागते.अन वग संपला कि कपडे काढावे लागतात.पण अाम्हांला कपडे चढवायचे हे जनतेच्याच हातात असते.त्यामुळे जनतेला कधीच विसरुन चालत नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या