शिरुर पोलीस स्टेशनअंतर्गत १०२ जणांना कारवाईचा बडगा

शिरुर, ता.२० फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी शिरुर तालुक्यातुन १०२ जणांना हद्दपारीच्या नोटिसा देण्यात अाल्या असुन मोठा पोलीस बंदोबस्त नेमला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली.

शिरुर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक प्रक्रिया अंतिम टप्प्यात अाली असुन मंगळवार(ता.२१) रोजी मतदान होणार असुन (ता.२३)रोजी मतमोजनी होणार अाहे.हि निवडणुक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पडावी या साठी अाचारसंहिता  लागु झाल्यापासुन अाजतागायत गुन्ह्यांची पार्श्वभुमी असणा-या ३१० जणांवर कलम १०७ अंतर्गत,५ इसमांवर कलम ११० नुसार कारवाई करण्यात अाली अाहे.रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना तडिपार करण्याचा व तात्पुरत्या तडिपारीसाठी ८७ जणांचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी शिरुर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात अाला असल्याची माहिती त्यांनी दिली.

दारुवर कारवाईचा बड़गा
शिरुर पोलीस स्टेशन ने विविध ठिकाणी छापे टाकुन अवैध दारु तयार करणारे व बाळगणारे अशा चाळिस ठिकाणी कारवाई केली असुन १३ जणांसाठी तडिपारीचे प्रस्ताव दिलेले अाहेत.

वाहतुक नियम उल्लंघनावर मोठा दंड वसुल

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या ६९८ जणांवर कारवाई करण्यात अाली असुन १लाख ४२ हजार ७०० रुपयांचा दंड वसुल करण्यात अाला अाहे.दारु पिउन वाहन चालवणा-या १७ चालकांवर व अवैध प्रवासी वाहतुक करणा-या २१ इसमांवर २४००० रुपये असा एकुण वाहतुक कारवाई चा ३ लाख २६ हजार ५०० रुपये दंड वसुल करण्यात अाला.

निवडणुकीला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
शिरुर पोलीस स्टेशन अंतर्गत निवडनुकीसाठी १ पोलीस उपअधिक्षक, ३ पोलीस निरीक्षक, १५ पोलीस अधिकारी, ३५० पोलीस कर्मचारी नेमण्यात अाले असुन महिला व पुरुष होमगार्ड तसेच वनरक्षक अादींची मदत घेण्यात अाली अाहे.या बंदोबस्तासाठी प्रभारी अधिकारी पोलीस उपअधिक्षक दळवी हे असुन सहायक बंदोबस्त प्रभारी अधिकारी म्हणुन गावडे हे काम पाहणार असल्याची माहिती शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या