शिरूरकरांनो धनदांडग्यांना व घराणेशाहीला पाडणार की...?

शिरूर, ता. 21 फेब्रुवारी 2017- शिरूरकरांनो आपल्याला आज (मंगळवार) मतदानाचा हक्क बजावयाचा आहे. परंतु, वर्षानुवर्षे राजकारणात असलेल्या घराणेशाहीला व धनदांडग्यांना पाडायाचे की निवडून द्यायचे हे तुमच्या हातात आहे. यामुळे पैशाची मस्ती असणाऱयांना मतदानाचा हक्कातून त्यांची जागा दाखवून द्याच.

तिकीट मिळविण्यापासून ते प्रचारादरम्यान आश्‍वासनांचा, पैशाचा महापूर दिसला आहे. घराणेशाही, भ्रष्टांची व धनदांडग्यांची मस्ती दिसून आली आहे. पैशाच्या जोरावर आपण काही करू शकतो, असे अनेकांना वाटत आहे. प्रचारादरम्यान अनेकांना पैशांचा पाऊस पाडून पैशाची उधळण केली आहे. मतदारापेक्षा आम्ही कसे मोठे आहोत, हेच जणू ते दाखवत होते. पण, तसे नाही. मतदारराजा हा तुमच्यापेक्षा मोठा आहे, हे लक्षात ठेवा. www.shirurtaluka.comने घेतलेल्या मतचाचणीदरम्यान नेटीझन्सने कौल दिला आहे. संकेतस्थळाने वेळोवेळी दिलेली वृत्त तंतोतंत खरी ठरली आहेत. यामुळे आपले स्थानिक कारभारी निवडताना घराणेशाही, धनदांडगे, गुंड, भ्रष्टांना त्यांची जागा दाखवून द्या. पैशाच्या जोरावर कोणी मस्ती दाखविण्याचा प्रयत्न करत असेल तर मतदारराजानं जागं राहायला हवे. घराणेशाही व पैशाच्या जिवावर सत्ता काबीज करण्याचे त्यांचे मनसुबे धुळीला मिळवायला हवेत.

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूका म्हणजे आपली जहागीरदारी असल्याचे अनेकांना वाटत आहे. सर्वसामान्य कार्यकर्ताचे निवडणूकीचे स्वप्न हे पैशाअभावी स्वप्नच राहात आहे. यापुढील काळात सर्वसामान्य नागरिकही निवडूण येऊ शकतो, हे आपण आपल्या मतदानातून दाखवून देऊयात. यामुळे आपला मतदानाचा हक्क जरूर बजावा. परंतु, मतदान करताना एकदा विचार कराच. धनदांडग्या व घराणेशाहीचे काय करायचे ते.

www.shirurtaluka.comने निवडणूक जाहिर झाल्यापासून वेळोवेळी मतचाचणी घेतली. या मतचाचणीचा निकाल पुढीलप्रमाणे.-


शिरूर तालुक्यात घराणे शाहीला प्राधान्य दिले जात आहे, असे आपणास वाटते काय?
    1) होय - 67
    2) नाही - 33
    3) माहित नाही - 0


सध्याची निवडणूक ही व्यक्तिकेंद्रित झाली अाहे, असे अापणांस वाटते का?
    1) होय - 81
    2) नाही - 19
    3) माहिती नाही - 0

शिरूर पंचायत समिती व जिल्हा परिषदेत तिकीट कोणाला मिळेल असे तुम्हाला वाटते?
    1) धनदांडग्यांना - 57
    2) सर्वसामान्य कार्यकर्त्याला - 43
    3) माहित नाही - 0
    4) अन्य - 0

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या