शिरुर तालुक्यात धक्कादायक निकाल लागतील ?

शिरुर, ता.२२ फेब्रुवारी २०१७ (विविध प्रतिनीधींकडुन) : संकेतस्थळ www.shirurtaluka.comने मतदानासाठी केलेले अन अावाहन अन विविध ठिकाणी झालेले मतदान पाहता  शिरुर तालुक्यातील प्रस्थापितांना धक्का बसणार असुन धक्कादायक निकाल हाती येणार असल्याचे जाणकारांकडुन बोलले जात अाहे.

शिरुर तालुक्याचे प्रथम संकेतस्थळ असलेले www.shirurtaluka.com हे शिरुर तालुक्यासह राज्यात प्रथम क्रमांकावर संकेतस्थळ असुन गेल्या सहा वर्षांपासुन सातत्याने महत्त्वाची भुमिका  बजावत असुन या ही निवडणुकिची इत्थंभुत माहिती जनतेपर्यंत पोहोचवत अाहे.शिरुर तालुक्यात झालेल्या निवडणुकित थेट केलेल्या पाहणीत शिरुर तालुक्यात  अनेक प्रस्थापितांना धक्का बसणार अाहे.या निवडणुकित प्रथमच उच्चविद्याविभुषित व चारिञ्यसंपन्न उमेदवार सर्वच पक्षांनी उभे केले असले तरी धनदांडग्यांना व घराणेशाहीची परंपरा देखिल काहि पक्षांनी सुरु ठेवली.त्यामुळे त्याचा फटका  देखिल ठिकठिकाणी बसणार अाहे. या निवडनुकित विकासाचा प्रमुख मुद्दा घेउनच मुख्य पक्षांनी त्याचे भांडवल करायचा प्रयत्न केला.व तो ही विविध प्रकारे जनतेच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न केला तरी देखिल सुज्ञ मतदारांनी मनी असलेल्या उमेदवारांनाच मतदान केले असल्याचे बोलले जात अाहे.

हि निवडनुक कोणाला प्रतिष्ठेची ?

शिरुर तालु्क्यात अनेक मातब्बर उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले. शिरुर हवेली चे माजी अामदार अशोक पवार यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्या सुजाता पवार, घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मंगलदास बांदल, शिरुर चे अामदार बाबुराव पाचर्णे व जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब नरके, माजी अामदार पोपटराव गावडे व सुनिता गावडे, जयश्री पलांडे, अादी नेत्यांसाठी ही निवडणुक अतिशय प्रतिष्ठेची असुन या निवडणुकिवरच भविष्यातील राजकिय गणिते  अवलंबुन असणार अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या