शिरुर तालुक्यात शांततेत ७५ टक्के मतदान

मांडवगण फराटा,ता.२२फेब्रुवारी २०१७ (राजेंद्र बहिरट)  :  जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या सार्वत्रीक निवडणूकीसाठी शिरूर तालुक्यात ७५ टक्के मतदान झाले तर  पूर्वभागात शंाततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

शिरूरच्या पूर्वभागात गावागावातील मतदान केंद्रावर सकाळी साडे सात वाजल्यापासून नागरीकांसह महिला वर्गांनी मोठी गर्दी केली होती सुरूवातीला मतदान यादीमध्ये नावे शोधण्यासाठी मतदारांना अर्धा ते पाउण तास वेळ लागल्यामुळे काही मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाली होती.ज्या त्या पक्षाने वाडया वस्तीवरील मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी अलीशान चार चाकी वाहनांची सोय केली होती.

दुपारपर्यंत उन्हाचा कडाका असूनही मतदान  केंद्रावर मात्र लांबच लांब रांगा लागलेल्या पहावयास मिळत होत्या. कार्यकर्त्यांची देखील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांना आणण्यासाठी चांगलीच तारांबळ उडत असल्याचे चित्र ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर पहावयास मिळाले. सध्या बाहरेगावी वास्तव्यास असलेले परंतू मतदान यादीत नाव आहे अशा मतदारांना मतदान करण्यासाठी गावात आणेपर्यंत उमेदवारांना चांगलाच खर्च करावा लागत असल्याचे दिसत होते.

काही अतीउत्साही कार्यकर्त्यांनी मोबार्इलचा गैरवापर करून मतदान करतानाची व्हीडीओ क्लीप काढून ती सोशल मिडीयावर या परीसरात व्हायरल केली असल्याची चर्चा या परीसरात सुरू होती. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या