संकेतस्थळाचे धनदांडग्यांचे व घराणेशाहीचे वृत्त ठरले 'हिट'

शिरूर, ता. 22 फेब्रुवारी 2017- www.shirurtaluka.comने 'शिरूरकरांनो धनदांडग्यांना व घराणेशाहीला पाडणार की...?' अशा हेडिंगखाली प्रसारीत केलेले वृत्त 'हिट' ठरले असून, मतदारांनी या वृत्ताचे स्वागत केले. मंगळवारी (ता. 21) दिवसभर हे वृत्त विविध व्हॉट्सऍपग्रुपवर फिरत होते.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान www.shirurtaluka.com ने महत्वाची भूमिका बजावली. मतदारांना जागृक करण्यासाठी वेळोवेळी वृत्त प्रसारित केले. मतदानाच्या दिवशी 'शिरूरकरांनो धनदांडग्यांना व घराणेशाहीला पाडणार की...?' या हेडिंगखाली सविस्तर वृत्त प्रसारीत केले होते. शिरूर तालुक्यातील विविध ग्रुपवर हे वृत्त दिवसभर शेअर होत होते. मतदानाच्या दिवशीच हे वृत्त प्रसारीत झाल्यामुळे अनेक धनदांडग्यांना व घराणेशाहीच्या उमेदवारांना फटका बसणार आहे.

शिरूर तालुक्यातील युवावर्ग सोशल नेटवर्किंगचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. मतदारराजाने व सूज्ञ वाचकांनी संकेतस्थळावरील वृत्त वाचून ऐनवेळी मतदान बदलाचा निर्णय घेतल्याची माहिती एका मतदाराने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली. दिवसभर अनेकांनी दूरध्वनी करून वृत्ताचे स्वागत केले. निर्भिड व परखड वृत्त दिल्याबद्दल अनेकांनी आभारही मानले.

प्रचारादरम्यान आश्‍वासनांचा, पैशाचा महापूर दिसला आहे. अनेकांनी मत विकत घेण्यासाठी गोवोगावी पैसेही वाटले आहेत. घराणेशाही, भ्रष्टांची व धनदांडग्यांची मस्ती दिसून आली आहे. पैशाच्या जोरावर आपण काही करू शकतो, असे अनेकांना वाटत आहे. प्रचारादरम्यान अनेकांना पैशांचा पाऊस पाडून पैशाची उधळण केली असली तरी शेवटच्या क्षणी अनेकांनी निर्णय बदलला आहे. संकेतस्थळाच्या वृत्ताचा फटका अनेकांना बसणार आहे. सुज्ञ युवावर्ग कोणापुढे झुकणार नसून, तोच बदल नक्कीच घडविणारा आहे.

www.shirurtaluka.comचे फेसबुकवर 21 हजार लाइक्स व व्हॉट्सऍपवर 600 हून अधिक व्हॉट्सऍप ग्रुप आहेत. शिवाय, ट्विटरवरही फॉलोअर्स आहेत. या सर्व सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून वृत्त दिवसभर शेअर होत होते. धनदांडग्यांच्या व घराणेशाहीपुढे न झुकता संकेतस्थळाच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱया वाचकांचे, मतदारांचे संकेतस्थळाच्या वतीने शतशः आभार.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या