शेतकरी पुञाची अामदार पुञावर मात

शिरुर, ता.२४ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : जिल्हयाचे लक्ष लागुन असलेल्या शिरुर ग्रामीण-न्हावरे गटात शेतकरी पुञाने अामदार पुञावर मात  करत सर्वांनाच धक्का दिला.

शिरुर तालुक्यात निवडणुक अारक्षण जाहिर झाल्यानंतर शिरुर ग्रामीण खुल्या जागेसाठी राखीव झालेला होता.शिरुर तालुक्याचे विद्यमान अामदार बाबुराव पाचर्णे यांचा बालेकिल्ला समजला जाणारा शिरुर ग्रामीण अन त्याच गटात उभे असलेले जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे यांच्या दृष्टीने सोयीचा गट म्हणुन उल्लेख केला जात होता.याच गटात पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासुद यांच्या नावाची जास्त चर्चा होती.

त्याचप्रमाणे अखेर पर्यंत उमेदवारीसाठी कोणाचेच नाव जाहिर होत नसल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.करडे गावचे माजी अादर्श सरपंच राजेंद्र जगदाळे यांनी त्यांच्या कार्यकालात कर्तुत्वाचा ठसा  उमटवत काम केल्याने पक्षाने खेळी लढवत राजेंद्र जगदाळे यांना उमेदवारी दिली.जगदाळे यांना ऐनवेळी उमेदवारी जाहिर  झाल्यानंतर त्या गटातील जगदाळे समर्थकांची प्रचारासाठी प्रचंड धवपळ उडाली.दुसरीकडे राहुल पाचर्ने यांची उमेदवारी लवकर जाहिर होउन प्रचाराला देखिल पुरेसा वेळ मिळाला होता.परंतु जगदाळे यांचा करडे,न्हावरे,निमोणे,गोलेगाव व परिसरात असलेला दांडगा परिचय,कामे करण्याची धमक व स्वच्छ प्रतिमेचा चेहरा या मुळे परिसराने चांगले मताधिक्य दिले. तर दुसरीकडे प्रचारात अाघाडीवर असुन देखिल शेवटी राहुल पाचर्ने यांना पराभवाचा धक्का बसला.

शिरुर तालुक्यात राष्ट्रवादीची असलेली लाट याही गटात दिसुन अाली असुन नवख्या उमेदवाराने अामदारांच्या बालेकिल्ल्यात दिलेला धक्का व पंचायत समिती च्या शिरुर ग्रामीण गणात अाबासाहेब सरोदे यांचा विजय भाजप ला अात्मपरिक्षण करायला लावणारा ठरला अाहे.तर राष्ट्रवादी ने खेळलेली खेळी व शिस्तबद्ध प्रचार यंञणा यामुळेच राजेंद्र जगदाळे यांना विजयाचा सोनेरी मुकुट परिधान करता अाला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या