सणसवाडीजवळ भीषण अपघात;२ ठार

सणसवाडी,ता.२५ फेब्रुवारी २०१७(प्रतिनीधी) : पुणे-नगर महामार्गावर सणसवाडी लगत  बोलेरो आणि एस. टी. बसमध्ये झालेल्या समोरासमोर भीषण अपघातात २ जण ठार झाले. तर १५ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
 
मिळालेली माहिती अशी कि,काल(ता.२४) रोजी सायंकाळच्या सुमारास बोलेरो  गाडी सणसवाडी शिक्रापूरहून पुण्याच्या दिशेने जात होती. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने बोलेरो गाडी दुभाजक तोडून पलिकडच्या रोडवर गेली.

यावेळी पुण्याहून अहमदनगरकडे येत असलेल्या भरधाव एसटीला बोलेरोची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की एस. टी.च्या एका बाजूचे मोठे नुकसान झाले. या अपघातात दोघे जागीच ठार झाले असून अन्य १५ जण गंभीर जखमी आहेत.जखमी व मयताची नावे कळु शकली नाहीत.जखमींना अपघातानंतर तत्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात अाले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले  अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या