भिमा नदीतील वाळू चोरीला अशिर्वाद कोणाचा?

तळेगाव ढमढेरे,ता.२५ फेब्रुवारी २०१७(जालिंदर अादक) : शिरूर तालुक्यातील शिवतक्रार म्हाळुंगी जवळील भिमा नदीच्या बंधाऱ्यातून बेसुमार वाळू चोरी होत असुन वाळुचोरांना अशिर्वाद कोणाचा अाहे असा सवाल सर्वसामान्यांकडुन केला जात अाहे.

शिवतक्रार म्हाळुंगी येथील भिमा नदीपात्रात वाळूतस्करांकडुन सध्या  वाळु उपसा  जोरात सुरु अाहे.महसुल यंञणा निवडणुक कामात व्यस्त असल्याच्या कारणाने शिरुर तालुक्याच्या बहुतांश भागात  चोरी-छुपे वाळु  चोरी जोरात सुरु अाहे.शिवतक्रार म्हाळुंगी येथे वाळूच्या अतिहव्यासापोटी नदीवरील बंधाऱ्याची अवस्था धोक्यात आणली असल्याचे तेथील स्थानिक नागरिक सांगत असुन अवस्था पाहून नागरिकांनी संबंधितांना विचारणा केली असता आरेरावची भाषा करण्यात आल्याचे सांगितले आहे. या सर्व बाबींचा घडलेला प्रकार शिरूरचे तहसीलदार यांना फोन करून  सांगितले असता त्यांनी घटनास्थळी पाहणी करण्यास येतो असे सांगितले परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. सध्या शिरूर तालुक्यात भिमा नदीचा वाळू लिलाव नसून हि दिवस रात्र येथे वाळू उपसा चालू असून महसूल विभागाचे दुर्लक्ष का होत आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. येथे दोन जेसीबी व काही ट्रक वाहतूक करताना सर्वांना दिसत असूनही महसूल विभाग मुग गिळून गप्प का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या