शिरुरला ४ हजार ९४० मतदारांनी वापरला नकाराधिकार

शिरुर,ता.२५ फेब्रुवारी २०१७ (सतीश केदारी) : शिरुर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकित नापसंत उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणावर नकाराधिकार वापरल्याचे पहावयास मिळाले अाहे.

शिरुर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी व पंचायत समितीसाठी १४ जागांसाठी निवडणुक लढविली गेली. पक्ष, व्यक्‍ती, विकासकामे या निकषांवर मतदारांनी उमेदवारांच्या पारड्यात मते टाकली खरी, मात्र दुसरीकडे एकही उमेदवार योग्य न वाटल्याने मतदारांनी ‘नन ऑफ द अबाव्ह’ (नोटा) अर्थात नकाराधिकाराचा वापर मोठ्या प्रमाणावर केल्याचे पाहण्यास मिळाले. जिल्हा परिषदेच्या ७ गटांमध्ये एकुण २५५४ मतदारांनी आणि पंचायत समितीच्या १४ गणांत एकुण २३८६ मतदारांनी नोटा(वरील पैकी एकही नाही) ला पसंती दर्शवली.या झालेल्या निवडणुकीत नकाराधिकार वापरणार्‍यांच्या संख्येत वाढ झालेली दिसली.त्याचबरोबर पंचायत समिती पेक्षा जिल्हा परिषदेच्याच उमेदवारांना जास्त 'नोटा' या पर्यायाची  मतदारांनी पसंती दिल्याचे स्पष्ट झाले अाहे.

लोकप्रतिनिधीची निवड करताना मतदार त्याची शैक्षणिक अर्हता, गुन्हेगारी पार्श्वभुमी,आदी बाबींचा विचार करतात. त्यानुसार उमेदवाराला कौल दिला जातो. मात्र, कोणताही उमेदवार लोकनेता होण्याच्या पात्रतेचा नाही, असे वाटल्यास नागरिकांना ‘नोटा’चा पर्याय वापरता येतो.
शिरुर तालुक्यात नोटा व बाद मतांची संख्या जास्त असल्याने देखिल  अनेकांचे मनसुबे  उधळले अाहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या