मातॄभाषेवर प्रेम करणे काळाची गरज- सु.ल.खुटवड

तळेगाव ढमढेरे, ता.२८ फेब्रुवारी २०१७(प्रा.एन.बी.मुल्ला) : जन्मदात्या आर्इप्रमाणेच मराठी ही आपली माता असून प्रत्येक मराठी माणसाने तिच्यावर प्रेम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द विनोदी साहित्यिक सु.ल.खुटवड यांनी केले.

तळेगाव ढमढेरे(ता.शिरूर) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने ज्येष्ठ कवी ज्ञानपीठकार वि.वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज)यांचा जन्मदिन ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खुटवड बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे होते.मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन व युवांकुर भित्तीपत्रकाचे उद्घाटनही साहित्यिक खुटवड यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की साहित्यिकांची समॄध्द परंपरा मराठी भाषेला आहे.कांही हजार वर्षांची परंपरा असलेल्या मराठीचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने आपापल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न करावा.अभिजात भाषेकडे वाटचाल करणा-या मराठीची आजच्या काळात तितकीच गरज असल्याचेही त्यांनी सांगीतले.मराठीचा आपल्या सर्वांना अभिमान असून नव्या पिढीने वाचन संस्कॄती जोपासावी असे आवाहन यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश ढमढेरे यांनी केले.

यावेळी प्राचार्य डॉ.पी.आर.पाटील, मराठी विभाग प्रमुख डॉ.संदिप सांगळे, प्रा.डॉ.पराग चौधरी, प्रा.कुंडलिक कदम, प्रा.दत्तात्रय कारंडे, डॉ.मनोहर जमदाडे, डा.पद्माकर गोरे, प्रा.रविंद्र भगत, प्रा.सोमनाथ पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संदिप सांगळे यांनी केले. प्रा.दत्ता कारंडे यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा.रविंद्र भगत यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या