शिरूर तालुक्यात बारावी परीक्षेसाठी ४ हजार ९३४ विद्यार्थी

शिरुर,ता.१ मार्च २०१७ (प्रा.एन.बी.मुल्ला) : शिरूर तालुक्यातुन बारावी परीक्षेसाठी 5 केंद्रातून 4 हजार 934 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत.तालुक्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर शांततेत व सुरळीत परीक्षेस सुरवात झाली.

शिरूर तालुक्यात शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, पाबळ येथील श्री भैरवनाथ विद्यालय, न्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालय, तळेगाव ढमढेरे येथील रायकुमार बी. गुजर प्रशाला व  शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशाला आदी पाच केंद्रात एच.एस.सी.बोर्ड परीक्षा होत आहे.

शिरूर केंद्रातून 1 हजार 780 विद्यार्थी परीक्षेस बसले असून शिरूर, रांजणगाव गणपती, कुरूंद व देवदैठण येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी या केंद्रातून परीक्षा देत असल्याची माहीती केंद्र संचालक एस.सी.चौधरी यांनी दिली.पाबळ केंद्रातून 785 विद्यार्थी परीक्षेस बसले असून पाबळ, लोणी धामणी, मलठण, केंदूर, कान्हूर मेसार्इ, टाकळी हाजी, पिंपरखेड येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी या केंद्रातून परीक्षा देत असल्याची माहीती केंद्र संचालक व्हि.ए.केदार यांनी दिली.

न्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालय केंद्रातून 614 विद्यार्थी परीक्षेस बसले असून न्हावरे, करडे, मांडवगण फराटा, वडगाव रासार्इ येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी या केंद्रातून परीक्षा देत असल्याची माहीती केंद्र संचालक एफ.टी.वाजे यांनी दिली.तळेगाव ढमढेरे केंद्रातून 495 विद्यार्थी परीक्षेस बसले असून तळेगाव ढमढेरे, निमगाव म्हाळुंगी, कासारी, करंदी, पिंपळे हिवरे येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी या केंद्रातून परीक्षा देत असल्याची माहीती केंद्र संचालक रत्नप्रभा देशमुख यांनी दिली.

शिक्रापूर केंद्रातून 1 हजार 260 विद्यार्थी परीक्षेस बसले असून शिक्रापूर, जातेगाव बुद्रुक, मुखर्इ, कोंढापुरी, कोरेगाव भिमा, कोयाळी पुनर्वसन, पिंपळे जगताप येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी या केंद्रातून परीक्षा देत असल्याची माहीती केंद्र संचालक एस.टी.गद्रे यांनी दिली.सर्वच परीक्षा केंद्रातून काल(ता.२८) रोजी सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणात इंग्रजीच्या पेपरने परीक्षेस सुरवार झाली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या