सुयोग्य नियोजनामुळेच जिल्हयात अव्वल- लाभशेटवार

शिरुर, ता.१ मार्च २०१७ (सतीश केदारी) : सुयोग्य नियोजनामुळेच जिल्ह्यात मतदानाची टक्केवारीत  शिरुर तालुका  अग्रस्थानी असल्याचे मत प्रांताधिकारी डॉ.वनश्री लाभशेटवार यांनी बोलताना सांगितले.

शिरुर तालुक्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकित एकाही केंद्रावर किरकोळ अपवाद वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.शांततेत व अत्यंत पारदर्शीपद्धतीने पार पडलेल्या निवडणुकिच्या पार्श्वभुमीवर निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन डॉ.वनश्री लाभशेटवार तर सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी काम पाहिले.त्याच अनुषंगाने संकेतस्थळाने त्यांच्याशी संवाद साधला.

या वेळी बोलतान लाभशेटवार म्हणाल्या कि, मतदानाबाबत मतदारांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असल्याने स्थानिक संस्था, विविध कंपन्या अादींची मदत घेउन जनजागृती करण्यात अाली.त्याचप्रमाने मतदानासाठी  थेट कंपन्यांना पञे देउन कामगारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात अाले होते.तसेच एक वेगळा पॅटर्ण राबवुन मतदानाच्या दिवशी अादर्श मतदान केंद्रासारखे देखिल वेगळे उपक्रम राबविण्यात अाले होते.दरम्यान च्या काळात शिरुर तालुक्यात बहुतांश ठिकाणी व्हिडिओ सर्व्हेंलन्स टिम कार्यरत होत्या.त्यामुळे देखिल कोठेही गंभीर बाबी न अाढळल्या नाहीत.तर गणेश काळे सारखा गुंड देखिल याच टिम मुळे हाती लागला अाहे.

शिरुर तालुक्यात अादर्श अाचारसंहितेचे प्रभावी व काटेकोरपणे अवलंब केल्याने तसेच सर्वच कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतल्यानेच मतदानाच्या टक्केवारीत जिल्ह्यात  शिरुर तालुका अव्वल ठरला असल्याचे प्रांताधिकारी डॉ.वनश्री लाभशेटवार व तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी संकेतस्थळ www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या