भिमा नदीतील जलपर्णीने घेतला शेतक-याचा जीव

वडगांव रासाई , ता.२ मार्च २०१७ (प्रतिनीधी):  येथील शेतकरी नंदकुमार मल्हारी शेलार (वय-४० वर्षे) यांचा जलपर्णीत अडकुन मृत्यु झाल्याची घटना घडली.प्रशासनाने सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहिम राबवुन ही मृतदेह हाती न लागल्याने शोधमोहिम थांबवली.

मिळालेल्या माहितीनुसार,वडगांव रासाई(ता.शिरुर) येथील शेतकरी नंदकुमार मल्हारी शेलार (वय-४० वर्षे) हे भीमानदी काठी असणारा विद्युत पंप  सुरु करण्यासाठी अाज (ता.१)रोजी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास नदीवर गेले असता विद्युतपंप सुरु होइना म्हणुन त्यांनी पाण्यात उतरुन पंपाच्या फुटबॉल पाइप ला अडकलेली जलपर्णी काढण्याच्या प्रयत्न केला. परंतु जलपर्णी काढत असताना त्यांचा त्यात अडकुन मृत्यु झाला.

या घटनेची वार्ता कळताच घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली.दरम्यान घटनेची माहीती समजताच शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे,तहसिलदार राजेंद्र  पोळ, पोलीस उपनिरीक्षक एस.एस.वाघमोडे अादींनी घटनास्थळी धाव घेउन घटनास्थळाची पाहणी केली.या वेळी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. माञ सायंकाळी उशिरापर्यंत स्थानिक ग्रामस्थ व अग्निशामक दल यांनी अटोकाट  प्रयत्न करुन देखिल शोधमोहिमेला यश अाले नव्हते.त्यामुळे अंधार पडल्याने व काहीच हाती लागत नसल्याने अखेर शोधकार्य थांबवुन पुन्हा सकाळी शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याचे समजले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या