रांजणगाव ला जमावाकडुन वाहनाची तोडफोड

रांजणगांव गणपती, ता.२ मार्च २०१७ (प्रतिनीधी) : येथे जमावाने रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष बबनराव कुटे यांची जीप अडवुन वाहनाची तोडफोड केली. या प्रकरणी कुटे यांनी रांजणगांव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली अाहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील "एम टेक' कंपनीचे पर्चेस मॅनेजर विठ्ठल जोशी यांनी मंगळवारी (ता. 28) फोन करून बोलावून घेतल्याने बबनराव कुटे हे ट्रान्स्पोर्टच्या कामासाठी त्यांना भेटायला स्कॉर्पिओ जीपमधून कंपनीत गेले होते. तेथील काम आटोपून दुपारी चारच्या सुमारास कंपनीतून बाहेर पडत असताना कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर थांबलेले सुहास मलगुंडे व इतर तिघांनी त्यांची जीप अडवली. मलगुंडे याने कुटे यांना शिवीगाळ व दमदाटी केली. व इतरांनी हातातील लोखंडी रॉडने जीपच्या सर्व काचा फोडल्या.

गाडीच्या टपावर व बॉनेटवरही रॉडने घाव घालून नुकसान केले. धमकी देऊन टोळके निघून गेले.या प्रकरणी पुढील तपास फौजदार शशिकांत भोसले करीत आहेत.

या संदर्भात कुटे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी सुहास पंढरीनाथ मलगुंडे (रा. ढोकसांगवी, ता. शिरूर) याच्यासह तिघांविरुद्ध बेकायदा जमाव जमवून गोंधळ घातल्याप्रकरणी; तसेच वाहनाचे नुकसान करून शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या