Live : शेतक-याचा २६ तासानंतर मृतदेह शोधण्यात यश

वडगांव रासाई, ता.२ मार्च २०१७ (सतीश केदारी/संपत कारकुड) : येथील भीमानदी पाञात बुडालेल्या शेतक-याला  शोधण्यास सुमारे २६ तासानंतर यश अाले.
सविस्तर माहिती अशी कि,वडगांव रासाई(ता.शिरुर) येथील शेतकरी नंदकुमार महाल्हारी शेलार (वय-४० वर्षे) यांचा काल भिमानदी पाञातील जलपर्णीत अडकुन मृत्यु झाल्याची घटना घडली होती. काल (ता.१) रोजी प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला.परंतु  सायंकाळी उशिरापर्यंत शोधमोहिम राबवली होती.राञी अंधार झाल्याने व नदीत मृतदेह शोधणे अशक्य असल्याने शोधमोहिम थांबवण्यात अाली होती. अाज सकाळी ९ वाजले पासुन पुन्हा शोधमोहिम हाती घेण्यात अाली.

अशी सुरु होती शोधमोहिम
भिमानदीच्या सर्वच पाञाला जलपर्णीने मोठ्या प्रमाणावर विळखा घातला अाहे. ज्या ठिकाणी तरुण बुडाला होता त्या ठिकाणी ग्रामस्थांनी दोन होडिच्या साहाय्याने पाण्यात उतरुन शोध घ्यायचा प्रयत्न केला.या ठिकानी जलपर्णी मोठ्या प्रमाणावर असल्याने ती हटवणे गरजेचे असल्याने स्थानिक भिल्ल समाजाचे तरुन व मांडवगण फराटा येथील युवकांनी एकञित येत जलपर्णी थोडी थोडी हटवण्याचा निर्णय घेतला.पाण्याचा दुर्गंध, अतिशय खराब पाणी व जलपर्णी ही शोधमोहिमेत अडथळा ठरत  होती. या वेळी तरुणांनी बांबु च्या साहाय्याने पाण्यात बुड्या मारत अंदाज घेत हळुहळु विविध जाळ्यांच्या सहाय्याने जलपर्णी हटवली.परंतु तरीदेखिल फुटबॉल पाइप असलेले निश्चित ठिकाण सापडत नव्हते. दरम्यान जलपर्णी हटविल्यानंतर अरुण खोमणे या मांडवगण फराटा येथील युवकाने पाण्यात बुडी मारला असता पाइपच्या तळाशी शेलार यांचा मृतदेह खाली डोके असलेल्या अवस्थेत अाढळुन अाल्याचे सांगितले.यावेळी इतर तरुणांनी मदत मृतदेह पाण्याचा बाहेर काढला.पाण्याबाहेर काढलेला मृतदेह पाहताच कुटुंबियांनी एकच अाक्रोश केला.शेलार यांच्या पश्चात पत्नी,मुलगा दोन भाउ,अाई असा परिवार असुन शेलार यांचा मनमिळावु स्वभाव होता.त्यांच्या दुर्दैवी निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात अाहे.

युवकांची चिकाटी अन यश
गेल्या दोन दिवसांपासुन सातत्याने स्थानिक व मांडवगणफराटा  तरुणांनी पाण्यात उतरुन शोधमोहिम राबवली.भिमानदीतील जलपर्णी धोकादायक असुनही तरुणांनी जीवाची पर्वा न करता दोन दिवसांत सुमारे १३ तास पाण्यात शोध घेण्याचा अाटोकाट प्रयत्न केला.याकामी अग्निशामक दलाच्या जवानांनी देखिल मदत केली. व अखेर स्थानिक युवकांच्याच प्रयत्नाला यश अाले अन मृतदेह हाती लागला.

भिमानदीच्या तिरी वडगांव रासाई-नानगांव पुलानजीक सादलगांव रोड लगत असलेल्या पाञात शेलार यांचा बुडालेला मृतदेह  शोधण्यासाठी  अग्निशामक दलाचे जवान,दोन अॅम्बुलन्स,वैद्यकिय पथक,अादी घटनास्थळी दाखल झालेले होते.तर पोलीस उपनिरीक्षक एस.एस.वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण गुपचे,अाबासाहेब जगदाळे,विक्रम जमादार,अंकुश अांबेकर अादींनी घटनास्थळी  चोख बंदोबस्त ठेवला होता. तहसिलदार राजेंद्र पोळ हे परिस्थितीवर नियंञण ठेवुन शोधमोहिमेस येणा-या अडथळ्यांवर लक्ष  ठेवुन होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या